Marathi Biodata Maker

निवडणुकीत चुरस वाढणार, भाजपकडून तिघांचे अर्ज दाखल

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (15:15 IST)
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आज उर्वरीत पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चा असतानाच भाजपने  मात्र
तिसरा उमेदवारही रिंगणात उभा केला आहे. यामुळे शिवसेना व भाजपची थेट लढत रंगणार यात शंका नाही.
 
संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. यानुसार भाजपने पियुष गोयल  आणि अनिल बोंडे  यांना उमेदवारी घोषित केली. यासोबतच शिवसेनेची कोंडी करण्यासाठी धनंजय महाडीक यांच्या रुपाने तिसरा उमेदवारही भाजपने निवडणुकीत उभा केला आहे. या पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
 
दरम्यान, भाजपचे विधानसभेतील संख्याबळ पाहता दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजप तिसरी लढवेल आणि जिंकेलही, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर एकदिवसीय संघातून बाहेर, आयुष बदोनीची निवड

राज ठाकरेंच्या धमकीला अण्णामलाईंनी दिले सडेतोड उत्तर: "मी मुंबईत येत आहे, माझे पाय कापून दाखवा..."

LIVE: लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप

नागपुरात लाखो रुपये रोख, शस्त्रे आणि ड्रग्ज जप्त

लाडकी बहीण योजनेवर निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप, आगाऊ रक्कम देणे थांबवले

पुढील लेख
Show comments