Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रक्षाबंधन: भावाला राखी बांधताना ताटात असाव्या या 7 वस्तू

रक्षाबंधन: भावाला राखी बांधताना ताटात असाव्या या 7 वस्तू
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षा सूत्र बांधते. हा सण साजरा करताना पूजेच्या ताटात सात वस्तू आवश्यक रूपात असाव्या. जाणून घ्या काय आहे त्या वस्तू:
 
कुंकू
कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी कुंकू लावणे शुभ मानले जाते. या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर तिलक लावून त्याच्या दीर्घायू होण्याची कामना करते.
 
अक्षता
कुंकू लावल्यानंतर कपाळावर तसेच डोक्यावर अक्षता टाकणे अनिवार्य असतं. याचा अर्थ भावावर शुभता बनलेली राहो.
 
नारळ
नारळ म्हणजे श्रीफळ. श्री अर्थात देवी लक्ष्मीचे फळ. हे फळ देताना बहिणीने प्रार्थना केली पाहिजे की भावाच्या जीवनात सुख-समृद्धी राहो आणि त्याची उन्नती व्हावी.
 
रक्षा सूत्र
रक्षा सूत्र बांधल्याने त्रिदोष शांत होतात. त्रिदोष अर्थात वात, पित्त आणि कफ. या दोषांमुळेच शारीरिक आजार उद्भवतात. मनगटावर रक्षा सूत्र बांधल्याने शरीरात यांचे संतुलन राहतं.
 
मिष्टान्न
राखी बांधल्यानंतर भावाला गोड खाऊ घातल्याने नात्यात गोडवा टिकून राहतो. गोड खाऊ घालताना प्रार्थना करावी की नात्यात हा गोडवा नेहमी टिकून राहावा.
 
दिवा
राखी बांधण्याची सुरुवात करत असतानाच दिवा प्रज्वलित करून घ्यावा. दिव्याच्या ज्योतीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
 
पाण्याने भरलेला कलश
पाण्याने भरलेला चांदीचा किंवा तांब्याचा कलश ताटात असावा. याच्या प्रभावाने भाऊ-बहिणीच्या जीवनात सुख आणि प्रेम स्थायी राहतं. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माहेरवाशीण