Marathi Biodata Maker

श्रावण आणि रक्षासूत्र

Webdunia
' श्रवण' नक्षत्रात बांधला जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहे. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण मासचे नामकरण 'श्रवण' नक्षत्रावरून झाले आहे. तर श्रवण नक्षत्राचे नामकरण मातृ-पितृ भक्त श्रावणकुमारच्या नावावरून झाले आहे. श्रवण नक्षत्रात तीन तारे असतात. ते तीन चरणांची (विष्णूची वामनावतारातील तीन पद) प्रतीके आहेत. याचप्रमाणे अभिजीत नक्षत्र दशरथ राजा यांचे प्रतीक आहे.

उत्तरा भाद्रपद नक्षत्र स्त्री-पुरुषांची जोडी असून श्रावणकुमारचे आई-वडील आहेत. उत्तराषाढ नक्षत्र हे दशरथ राजाचे व्यासपीठ असून पूर्वाभाद्रपदावर श्रावणकुमार आपल्या आई-वडीलांसोबत स्थानबध्द झाले आहेत.

श्रावण महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करत असतो. कर्क राशी ही जलचर राशी आहे. दशरथ राजाने श्रावणी पौर्णिमेला आपल्या पापाचे प्रायश्चित घेतले होते. त्याचप्रकारे पृथ्वीवरील लोक श्रावण मासात अधिक कर्मकांड करताना दिसतात. श्रावण मास अध्ययन व अध्यापनासाठी श्रेष्ठ मानला जातो. 28 नक्षत्रांमध्ये श्रावणाने विशेष महत्त्व प्राप्त केले आहे. श्रावण नक्षत्रात ज्यांचा जन्म होतो, ते स्वभावाने पराक्रमी, स्वाभिमानी, सहनशील, स्पष्टवादी व सेवाभावी असतात. तसेच ते चांगली प्रगती साधतात. परंतु शत्रूच्या भी‍ती पोटी चांगले कार्य अर्ध्यातून सोडून देत असतात.

रक्षासूत्र व श्रवण नक्षत्र यांचाही संबंध आहे. मोहरी, केशर, चंदन, अक्षदा, दूर्वा, सूवर्ण आदी कापडात बांधून ते पुरुषांच्या उजव्या व महिलांच्या डाव्या हातावर बांधून रक्षाबंधन पूर्वी केले जात होते. मात्र काळानुरूप परंपरेत परिवर्तन घडून आल्याने रक्षाबंधन भाऊ-बहिणीचा उत्सव झाला आहे. या दिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करते मात्र त्यासोबत त्याच्यावर असलेल्या कर्तव्यांची जाणीव ही करून देत असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आज तीळ द्वादशी, तीळ दान करण्याचे महत्त्व, सुंदर कथा जाणून घ्या

गुरुवारी साई चालीसा पाठ करा, बाबांचा आशीर्वाद मिळवा

आरती गुरुवारची

करिदिन संपूर्ण माहिती

शिवपुराणानुसार भगवान शिवाने मृत्यूची ही ८ लक्षणे सांगतिली आहेत

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments