Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय तुम्ही आदर्श भाऊ आहात, ओळखा आपल्या पवित्र प्रेमाला

Webdunia
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (14:47 IST)
तुम्ही स्वत:ला जगातील सर्वात चांगला भाऊ मानता पण काय तुमची बहीण या गोष्टीला स्वीकारते? मग आम्ही रक्षाबंधनाच्या शुभ प्रसंगी आपल्या पवित्र प्रेमाची ओळख करून घेऊया. भावांसाठी एक प्रश्न तालिका देण्यात येत आहे. तुम्ही एक कागद आणि पेंसिल घेऊन बसा. प्रत्येक प्रश्नाचे तुम्ही सातत्याने उत्तर द्या आणि त्याला कागदावर नोट करून घ्या. टेबलाच्या शेवटी आम्ही दिलेल्या अंक तालिकेप्रमाणे नंबर मिळवून घ्या आणि शेवटी त्याला जोडून आम्ही दिलेल्या निष्कर्षाला वाचून ठरवा की तुम्ही खरंच एक आर्दश भाऊ आहात का?  
 
1. तुमची बहीण नेहमी तुमची अल्मारी, टेबल आणि बॅग आदि व्यवस्थित करते. तिच्या या व्यवहाराला तुम्ही कशा प्रकारे बघता :
 
a) तिला घर सजवायची सवय आहे.  
b) आईला प्रभावित करण्याचा प्रयत्न करते.  
c) माझ्यावर डोळा ठेवण्याचा एक मार्ग आहे.   
d) ती माझी केअर करते. 

2. तुमची लहान बहीण पहिल्यांदा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेत आहे. कॉलेजच्या औपचारिकता पूर्ण करण्यास तिला त्रास होत आहे. आता तुमची प्रतिक्रिया काय असेल :
 
a) तुम्ही स्वत:जाऊन कॉलेजच्या औपचारिकता पूर्ण करून द्याल.  
b) तिला चालान फार्म, बँक ड्राफ्ट इत्यादींबद्दल घरातून व्यवस्थित समजावून पाठवाल.   
c) तिच्या कॉलेजमध्ये जाऊन तिचे प्रत्येक काम करून द्याल.  
d) तिला तिचे काम स्वत:करण्याचा सल्ला द्याल. 

3. तुमच्या बहिणीची कोचिंग उशीरा रात्रीपर्यंत सुटते. तिला रोज एकटे यावे जावे लागते. या प्रकारे बहिणीला रोज रात्री उशीरा घरी येणाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल:
 
a) तुम्ही तिला एखादी दुसरी कोचिंग क्‍लास ज्‍वॉइन करण्याचा सल्ला द्याल.  
b) तुम्ही रोज तिला घ्यायला जाल.  
c) तिला सावध राहण्याचा सल्ला देऊन तिची कोचिंग सुरू राहू द्याल.  
d) आई वडिलांना सांगून तिचे कोचिंग क्लास बदलवून द्याल.  

4. तुमच्या बहिणीला कॉलेजचे काही सीनियर मुलं त्रास देत आहे. तिनी घरी येऊन या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहे. आता तुमचे पुढचे पाऊल काय असेल :

a) तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जाऊन त्या मुलांशी भांडणं कराल.  
b) तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तेथील अध्यापकांना त्या मुलांबद्दल तक्रार कराल.  
c) प्रकरणाला समजून, बहिणीला यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवाल.  
d) तिला कॉलेजच्या सर्व मुलांपासून दूर राहण्याचा सल्ला द्याल.

5. तुमच्या बहिणीचे, तुमच्या काही मित्रांसोबत चांगली गट्टी जमली आहे. तर तुमच्या मित्रांची आणि बहिणीच्या मित्रतेवर तुमची काय प्रतिक्रिया असेल : 
a) तुम्ही तुमच्या बहिणीला तुमच्या मित्रांबरोबर न बोलण्याचा सल्ला द्याल.   
b) तुम्ही तुमच्या मित्रांचे घरी येणे जाणे बंद करून द्याल.  
c) तुम्ही तुमच्या बहिणीला मर्यादेत राहून मित्रता ठेवायला सांगाल.  
d) तुम्ही या नात्याला फारच सहजतेने घ्याल. 

6. तुमची बहिणी तुमच्यापासून काहीच लपवत नाही. एक दिवस ती तुम्हाला त्या मुलाची भेट घालवून देते ज्याला ती पसंत करते. हे ऐकल्यावर तुमची काय प्रतिक्रिया असेल :
a) तुम्ही त्या मुलाला भेटाल आणि त्याच्याबद्दल माहिती काढाल.  
b) बहिणीला रागावून, आईजवळ तिची तक्रार कराल.  
c) तिला या सर्व बाबींपासून दूर राहण्याचा सल्ला द्याल व अभ्यासात लक्ष्य देण्याचा सल्ला द्याल.  
d) त्या मुलाशी एकटे जाऊन भेटाल आणि त्याला बहिणीहून दूर राहण्याचा सल्ला द्याल.  

7. तुम्ही एखाद्या मुलीशी प्रेम करता, पण तुमची बहीण त्या मुलीला पसंत करत नाही. अशा परिस्थितीत तुमची काय प्रतिक्रिया असेल :
a) तुम्ही तिच्या विचारांना जुनं सिद्ध करण्याचा प्रयत्न कराल.  
b) तुम्ही तिच्या प्रेमात खोटं काढणे सुरू कराल.  
c) तुम्ही तुमच्या बहिणीला समजवण्याचा प्रयत्न कराल.  
d) बहिणीची गोष्ट मानून त्या मुलीशी संबंध तोडून टाकाल.

स्वत:चे परीक्षण करा  
खाली दिलेल्या अंक तालिकेतून आपल्या उत्तरांचे मिलन करा. अंकांना जोडून स्वत:चे आकलन करा.  
A- B- C- D
प्रश्न1. 6- 4- 2- 8
प्रश्न2. 8- 6- 4- 2
प्रश्न3. 4- 8- 6- 2
प्रश्न4. 8- 4- 6- 2
प्रश्न5. 2- 4- 8- 6
प्रश्न6. 6- 2- 4- 8
प्रश्न7. 2- 4- 6- 8
जर तुमचा योग 25 ते 45च्या मध्ये आहे, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये एक चांगल्या भावाचे सर्व गुण आहे. वेळेप्रमाणे तुमच्या प्रेमात नक्कीच वाढ होईल.  
 
जर तुमचा योग 45 ते 52च्या मध्ये असेल तर याचा अर्थ असा की तुमची बहीण फारच भाग्यशाली आहे, कारण तिला तुमचा सारखा भाऊ मिळाला आहे. तुमचे प्रेम संतुलित आहे, जे पुढे जाऊन बहिणीचे जीवन सुखमय करण्यास मदतगार आहे.  
 
जर तुमचा योग 52 ते 64च्या मध्ये असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या बहिणीला गरजेपेक्षा जास्त प्रेम करता. बहिणीबद्दल प्रेम असणे फारच चांगली गोष्ट आहे, पण या गोष्टीकडे लक्ष्य देणे फार गरजेचे आहे की तुमचे अतिप्रेम तिला आत्मनिर्भर होण्यापासून रोखत तर नाही आहे ना.  
 
समाप्त 
सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments