Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुतीपेक्षा कमी वीजदर

Webdunia
सोमवार, 22 ऑगस्ट 2016 (16:59 IST)
अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन
सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात आणि ३ रुपये ७१ पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
 
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांना तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये ७१ पैसे अधिक इंधन अधिभार असे वीजदर आहेत. हे दर घरगुती वीजदरापेक्षाही कमी आहेत. त्यामुळे घरगुती किंवा वाणिज्यिक वीजजोडणीतून गणेशोत्सवासाठी अनधिकृत वीजपुरवठा घेतल्यास आर्थिकदृष्ट्या महाग राहणार आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृत वीजपुरवठाच घ्यावा आणि त्याजोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचे दर घरगुतीपेक्षा कमी ठेवण्यात आले आहेत. 
 
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शॉर्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले, पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची दाट शक्यता असते. 
 
तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणच्या अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत अथवा २४ तास सुरू असणाऱ्या १८००-२००-३४३५/१८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या व रोहित्रांचा गणेशोत्सवातील तसेच मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. 
 
गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे.वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

पुढील लेख
Show comments