Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गूढ आजार : महाराष्ट्रात 11 गावे दहशतीत; आजारामुळे लोकांना पडत आहे टक्कल

Webdunia
शनिवार, 11 जानेवारी 2025 (11:54 IST)
Buldhana news: महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीच्या समस्येमुळे लोक घाबरले आहे. जिल्ह्यातील 11 गावांमधील लोक या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचा शोध लागल्यानंतर, लोक स्वतःचे केस कापत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये एक गूढ आजार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या आजारामुळे लोकांचे केस गळू लागले आहे. परिस्थिती अशी आहे की 11 गावांमधील लोक या आजाराने ग्रस्त आहे. सुरुवातीला 3 गावांतील लोकांचे अचानक केस गळण्याची घटना घडली. नंतर हा आजार हळूहळू वाढत गेला आणि आता 11 गावांमधील लोक याचा त्रास सहन करत आहे.

तसेच हा कोणता आजार आहे हे अजून कळलेले नाही. आतापर्यंत या 11 गावांमध्ये 127 रुग्ण आढळले आहे, ज्यांचे केस गळू लागले आहे. या आजाराबाबत नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम केवळ पुरुषांमध्येच नाही तर महिला आणि मुलांमध्येही दिसून येतो. तसेच गावातील लोक म्हणाले की एकदा केस गळायला सुरुवात झाली की, सहा ते आत दिवसांत डोक्यावरील सर्व केस गळून पडतात. या आजारामुळे लोक पूर्णपणे टक्कल पडत आहे. सुरुवातीला बोंडगाव, कलवड आणि हिंगणा गावात या आजाराचे रुग्ण आढळले. ही गावे शेगाव तालुका अंतर्गत येतात. बुलढाणा जिल्ह्याचा आरोग्य विभाग या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गावात पोहोचला आहे आणि रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की आम्ही पाण्याचे नमुने देखील चाचणीसाठी पाठवले आहे. रुग्णांच्या डोक्याच्या भागाची बायोप्सी देखील केली जाईल, ज्यामुळे रोगाचा शोध घेण्यास मदत होईल.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

Lal Bahadur Shastri Death Anniversary:लाल बहादुर शास्त्री पुण्यतिथी

Ram Mandir 2025 Anniversary Wishes अयोध्यात श्रीराम मंदिर प्राण-प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा संदेश मराठी

रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

सततच्या विमान अपघातांमुळे नागपूर विमानतळ झाले सतर्क, पक्षी आणि पाळीव प्राण्यांना प्रवेश बंदी!

LIVE: मुंबईतील जुहू परिसरात चार बांगलादेशी नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments