Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भंडारदरात नव्याने 21 दलघफू पाणी दाखल, रतनवाडीमध्ये तब्बल 131 मिमी पावसाची नोंद

Webdunia
मंगळवार, 21 जून 2022 (21:21 IST)
अहमदनगर जिल्ह्याचा रतनवाडीमध्ये तब्बल 131 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पाऊसामुळे भंडारदरा धरणात 21 दलघफू पाणी दाखल झाले आहे. भंडारदरातील पाणीसाठा 2467 दलघफू आहे.

पाणलोटात मान्सून रविवारी दाखल झाला. परिसरात या दिवशी सायंकाळी पाच वाजेपासून अधूनमधून सरी कोसळत आहेत. भंडारदरा 13, घाटघर 40, पांजरे 29, रतनवाडी 131 तर वाकी 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे डोंगर दर्‍यांमधील छोटे ओढे-नाले सक्रिय झाले असून धरणाच्या पाण्यात विसावू लागले आहेत.

काल सोमवारीही पाणलोटात पावसाळी वातावरण टिकून होते. काल दिवसभरात भंडारदरात 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अधूनमधून रिपरिप सुरू आहे. पाणलोटातही अधूनमधून सरी कोसळत आहेत. पाऊस पडता झाल्याने या भागातील शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

112 दलघफू क्षमतेच्या वाकी तलावात यंदा साठा चांगला असून पावसाचे प्रमाण वाढल्यास दोन तीन दिवसांत हा तलाव निम्मा भरले अशी शक्यता आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments