Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जवानाचा उष्माघाताने बळी!

Webdunia
शनिवार, 22 एप्रिल 2023 (18:19 IST)
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर भरती अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. हर्षल संजय ठाकरे (वय २१ वर्ष, आर्मी नं. I ३४५१७४६) असे निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. 
  
  हर्षल हा मूळ धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून त्याला उलट्या व ताप याचा त्रास झाल्यामुळे आर्टिलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नाशिकमधील देवळाली कॅम्प पोलिस पुढील तपास करीत आहेत.  
  
 या प्रकरणी आर्टिलरी सेंटरतर्फे लेखी माहितीद्वारे पोलिसांना कळवण्यात आले आहे. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलिसांनी हर्षल ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.. हर्षल ठाकरे याला उष्माघाताचा त्रास का झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. देवळाली कॅम्प पोलिस पुढील तपास करीत आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे नाशिकमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. आज सकाळी अकरा वाजता संपूर्ण गावात शहीद अग्नीवीर हर्षल संजय मराठे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर पार्थिवावर मोठा भाऊ गौरव मराठे यांनी अग्नीडाग देऊन शासकीय इतामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

पूजा खेडकरची IAS सेवा संपुष्टात,केंद्र सरकारची कारवाई

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली,तिघांचा मृत्यू, 27 जणांना वाचवण्यात यश

WhatsApp: व्हॉट्सॲपच्या या युजर्सना मिळणार नवीन ॲप अपडेट

सिमरनने महिलांच्या 200 मीटरमध्ये उपांत्य फेरी गाठली

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक गाडले गेले

पुढील लेख
Show comments