Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईसह महाराष्ट्रातील 25 जिल्हे अनलॉक होतील,11 मध्ये कडक निर्बंध वाढणार,उद्धव सरकार आज निर्णय घेऊ शकते

Webdunia
रविवार, 1 ऑगस्ट 2021 (12:37 IST)
राज्यात कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये घट होत असताना निर्बंधांमध्ये काही शिथिलता देखील आढळू शकते.राज्य सरकार आज राज्यभरातील 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूशी संबंधित निर्बंध शिथील करू शकतो. सरकार असे करण्याच्या योजनेवर विचार करत असल्याची घोषणा करत, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की, अधिकारी पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्याचा विचार करतील.
 
आतापर्यंत महाराष्ट्रात मॉल्स आणि चित्रपटगृहे पूर्णपणे बंद आहेत. राज्यभरात कलम 144 लागू आहे आणि सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोक एकत्र होऊ शकत नाहीत, तर लोकांची हालचाल किमान संध्याकाळी 5 नंतर कमी असावी. सध्याच्या निर्बंधांबद्दल बोलताना, अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने दररोज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत खुली राहण्याची परवानगी आहे आणि अनावश्यक गोष्टींची दुकाने फक्त कामाच्या दिवसात उघडण्याची परवानगी आहे. तसेच, जिम आणि सलून फक्त 4 वाजेपर्यंत उघडे असतील, त्यांना एसी चालवण्याची परवानगी नाही. रेस्टॉरंट्स फक्त आठवड्याच्या दिवशी संध्याकाळी 4 पर्यंत उघडू शकतात, ज्यात फक्त पॅक  करून म्हणजे टेकअवे ला परवानगी आहे. 
 
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले होते की, मुंबईसह 25 जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूवरील निर्बंध शिथील केले जाऊ शकतात. तथापि, हे जिल्हे असे असतील ज्यांनी सकारात्मकतेचा दर आणि कोरोनाचा वाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा कमी नोंदवला आहे.
 
आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, उर्वरित 11 जिल्ह्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, ज्यांचा सकारात्मकता दर आणि कोरोना वाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्य आरोग्य आणि मदत आणि पुनर्वसन विभागांकडून यासंदर्भातील एक संयुक्त प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. याचा अर्थ सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी,अहमदनगर,सोलापूर,बीड, रायगड, पुणे आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड -19 निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता राहणार नाही. या सर्व भागात कोरोना संसर्गाचा वाढीचा दर राज्याच्या सरासरीपेक्षा 0.11 टक्के अधिक नोंदवला गेला आहे.
 
महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी असेही म्हटले की, प्रशासन गरज पडल्यास या भागात कठोर कोरोना प्रतिबंध लागू करण्याचा विचार करू शकते. गेल्या महिन्यात डेल्टा-प्लस व्हेरिएंटची प्रकरणे आढळून आल्यानंतर महाराष्ट्राने पाच-स्तरीय सूट योजना कमी करून तीनवर कडक कोविड -19 निकष लागू केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

LIVE: पालघर येथे झालेल्या स्फोटात चार जण जखमी

पत्नीचे महागडे छंद पुरवण्यासाठी पतीने केली दहा लाख रुपयांची चोरी

वाल्मिक कराड यांना दिलेल्या ईडीच्या नोटीसवर सुप्रिया-अजित समोरासमोर

एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या, मृतदेह पोत्यात भरून बेड बॉक्समध्ये लपवले

भाजपने महाराष्ट्रात सुरु केले 'घर चलो अभियान', दीड कोटी लोकांना भाजपचे सदस्यत्व देणार

पुढील लेख
Show comments