Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लक्ष्मीपूजनादिवशीच 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 5 नोव्हेंबर 2021 (17:37 IST)
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपुरात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरुच आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चंद्रपुरात तीन शेतकर्यांनी आपल्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट केला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुद्रुक येथे 25 वर्षीय तरुण शेतकरी वैभव अरुण फरकडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर चेक पिपरी येथील 34 वर्षीय शेतकरी महेश भास्कर मारकवार यांनी विषारी औषध प्राशन करत ऐन ‍लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच जगाचा निरोप घेतला. तरुण शेतकर्यांानी ऐन दिवाळी सणाच्या दिवशी आयुष्याचा शेवट केल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिसर्यान एका घटनेत चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंड पिपरी तालुक्यातील किरमीरी येथील बंडू रामटेक यांनी आपलं जीवन संपवलं आहे. मृत रामटेके यांच्या सोयाबीनच्या ढिगाला आग  लागल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीन शेतकर्यांआनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments