Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

UPSC मध्ये महाराष्ट्राचे 50 उमेदवार यशस्वी

Webdunia
शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (10:45 IST)
UPSC CSE 2020 अंतिम निकाल: UPSC नागरी सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी एकूण 761 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. यूपीएससीने जारी केलेल्या माहितीनुसार,नागरी सेवा परीक्षा (मुख्य) जानेवारी 2021 मध्ये घेण्यात आली.या परीक्षेत यशस्वी उमेदवारांची मुलाखत ऑगस्ट-सप्टेंबर 2021 मध्ये पूर्ण झाली आहे.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून या परीक्षामध्ये बिहार राज्यातील शुभम कुमार देशात प्रथम आला आहे. शुभम कुमार ने आय आयटी मुंबईतून सिव्हिल इंजिनियरमध्ये बी.टेक पदवी घेतली आहे. तर जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्राची मृणाल जोशी आणि विनायक नरवदे हे 36 आणि 37 व्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर विनायक महामुनी हा युपीएससी परीक्षामध्ये 95 व्या स्थानी आला आहे.या व्यतिरिक्त नीतिशा जगताप,श्रीकांत मोडक, अनुजामुसळे,स्नेहल ढोके,अनिकेत कुलकर्णी,बेंकेश पवार,पूजा कदम,स्वप्नील चौधरी,शरण कांबळे,सायली म्हात्रे, विकास पालवे,हर्षल घोगरे,निलेश गायकवाड, हेतल पगारे,सुबोध मानकर,शिवहर मोरे,स्वरूप दीक्षित,पियुष मडके,सुब्रह्मण्यम केळकर,देवदत्त,मेश्राम,किरण चव्हाण,सुदर्शन सोनावणे,हे सर्व महाराष्ट्रातून पुढील नियुक्तीसाठी यशस्वी पात्र ठरले आहे.
 
कोरोना महामारीमुळे सगळ्याच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यामुळे युपीएससीची मुलाखत प्रक्रिया देखील लांबणीवर गेली होती. त्यामुळे मुख्य निकालही उशिरा लागला आहे. युपीएससीची मुख्य परीक्षा जानेवारी 2021 मध्ये पार पाडली होती. तर मुख्य परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात झाल्या होत्या.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षासाठी जनरल मधून 263, ईडब्लूएसमधून 86,ओबीसीप्रवर्गातून 229, तर एससी 122 आणि एसटी मधून 61 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. एकूण 761 जागांसाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 180 आयएएस, आयएफएस 36, आयपीएस 200, अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवा 302 आणि ब गटातील प्रशासकीय सेवा 188 या पदांसाठी उमेदवारांची निवड झाली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिल्लीमध्ये प्रशांत विहारमधील PVR सिनेमाजवळ भीषण स्फोट

नागालँडमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

LIVE: अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांना चोख प्रत्युत्तर दिले

'तुमच्यावर गर्व आहे बाबा', मुलगा श्रीकांत शिंदेंची एकनाथ शिंदेंसाठी एक्स वर पोस्ट

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांची चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदासाठी शपथ

पुढील लेख
Show comments