Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शासकीय अधिकाऱ्यांसाठी अनुकंपा नियुक्तीचे 6 महत्वाचे निर्णय

Webdunia
गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (18:32 IST)
शासकीय अधिकाऱ्यांना देखील अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू करण्यात आले आहे, निधन झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास नियुक्ती दिली जाणार आहे. याबाबतचा निर्णय आज (26 ऑगस्ट) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी आशा स्वंयसेविका आणि गट प्रवर्तकांचा मोबदला वाढवण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. आजच्या बैठकीत मंत्रिमंडळाने एकूण सहा महत्त्वाचे निर्णय घेतले.
  
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील सहा महत्त्वाचे निर्णय
1. शासकीय अधिकाऱ्यांना देखील अनुकंपा नियुक्तीचे धोरण लागू. निधन झालेल्या अधिकाऱ्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास नियुक्ती देणार (सामान्य प्रशासन)
2. कुटुंब न्यायालयातील सरळसेवेने नियुक्त न्यायाधीशांना जिल्हा न्यायाधीश (प्रथम प्रवेश, निवड श्रेणी, उच्च समयश्रेणी) वेतनश्रेणी लागू (विधि व न्याय विभाग)
3. राज्य तंत्रशिक्षण मंडळ, अधिनियम-1997 मधील कलमांमध्ये सुधारणा (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
4. आशा स्वंयसेविका व गट प्रवर्तकांचा मोबदला वाढवला (सार्वजनिक आरोग्य विभाग)
5. केंद्राच्या योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनाबाबत बँक खाती उघडण्यासाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा (वित्त विभाग)
6. कृषी आधारीत व अन्न प्रक्रिया उद्योगांना सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मोठ्या व विशाल प्रकल्पांसाठी विहीत गुंतवणूक, रोजगाराचे निकष आणि प्रोत्साहने सुधारीत करणार (उद्योग विभाग)

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

पुढील लेख
Show comments