Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह ८ जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी

Webdunia
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019 (15:52 IST)
राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील, ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर. ए. नागरगोजे, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग कल्याण विभागाचे उपसचिव रविंद्र गुरव, औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, चंद्रपूर जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, ठाणे जि.प. अध्यक्षा दीपाली पाटोळे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदांचे सदस्य उपस्थित होते.
 
प्रारंभी आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार विविध प्रवर्गासाठीच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. आरक्षण काढताना २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांचे आरक्षण चिठ्ठी टाकून काढण्यात आले.
 
विविध प्रवर्ग आणि त्यासाठी अध्यक्षपद आरक्षित झालेल्या जिल्हा परिषदा पुढीलप्रमाणे आहेत.
· अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
· अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
· अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदूरबार, हिंगोली
· अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
· नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशिम, अमरावती
· नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदूर्ग, सांगली, वर्धा, बीड
· खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
· खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोल्हापुरात निवडणूक जिंकल्यानंतर मिरवणुकीत आग लागली, 3-4 जण जखमी

LIVE: मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार निर्णय

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार अमृता फडणवीस यांनी खुलासा केला

IND vs AUS: यशस्वी-राहुल यांनी विक्रमांची मालिका केली

दुहेरी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्राउनलीने केली निवृत्तीची घोषणा

पुढील लेख
Show comments