Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाकरे बंधूची भेट निव्वळ योगायोग

Webdunia
सोमवार, 18 सप्टेंबर 2017 (10:02 IST)

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेट निव्वळ योगायोग असल्याचा खुलासा शिवसेनेने केला आहे. इंडियन प्रीमियर फुटसाल लीग स्पर्धेनिमित्त आदित्य आणि अमित ठाकरे यांची भेट झाली. लोअर परळमधील सेंट रेजिस हॉटेलमध्ये ठाकरेंची भेट झाली. 

त्यानंतर  उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेने याबाबत खुलासा करत ही भेट योगायोग असल्याचे म्हटले आहे. ‘आदित्य ठाकरे हे एमडीएफएचे अध्यक्ष असल्यामुळे एका फुटबॉल स्पर्धेच्या आयोजकांनी आदित्य यांची भेट मागितली होती. त्याच वेळी आदित्य ठाकरे यांनी फिगो यांची सदिच्छा भेट घेतली. तेथे अमित ठाकरेदेखील उपस्थित होते. तेव्हा आदित्य आणि अमित भेटले, यात विश्लेषण करण्यासारखे काही घडले नाही, दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चादेखील झाली नाही, असा खुलासा शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनी केला.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments