suvichar

पाच रुपयांची कटलेली पतंग जिवावर बेतली

Webdunia
गुरूवार, 19 जानेवारी 2023 (21:32 IST)
नाशिक शहरात कटलेल्या पतंगामागे पळतांना रस्त्यावर पडून एक मुलगा जखमी झाला होता. त्याच मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. अकीब रफीक बागवान असे मृत्यू झालेल्या 13 वर्षीय मुलाचे नाव आहे. नाशिकच्या भारतनगर परिसरातील ही घटना असून अकीब जखमी झाल्यापासून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
 
मकर संक्रातीला पतंग उडविणे, पतंग काटने अशी स्पर्धाच सुरू असते. त्यानुसार पतंग कटलेल्या अवस्थेत असतांना तिला पकडण्यासाठी मुलं धावत असतात. अशीच कटलेली पतंग पकडण्यासाठी धावत असतांना एका मुलगा रस्त्यावर पडला होता, बुधवारी अकीब बागवान नावाचा मुलगा जखमी झाला होता. तो पडलेल्या अवस्थेत पाहून त्याला त्याच्या ओळखीच्या व्यक्तींनी खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. अकीबला दम लागल्याने तो खाली पडला होता त्याचवेळी डोक्याला जबर मार लागला. अकीबवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा रात्री उशिरा मृत्यू झाला आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

बारामती निवडणुकांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, "अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको होती.

नेपाळच्या चार जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने हाहाकार माजवला

नागपुरात बेपत्ता पतीचा शोध महागात पडला, महिलेवर भोंदू बाबाने बलात्कार केला, आरोपीला अटक

LIVE: शरद पवार म्हणाले अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको

अकोला येथे दोन गटांमध्ये भीषण संघर्ष, अनेक जण जखमी

पुढील लेख
Show comments