Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवारांच्या नावावर नवा विक्रम, सहाव्यांदा झाले राज्याचे उपमुख्यमंत्री

Webdunia
गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (19:20 IST)
Ajit Pawar news: महाराष्ट्रात आज नवे सरकार स्थापन झाले असून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  तसेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नेते म्हणून अजित पवार यांच्या नावावर नवा विक्रम नोंदवला गेला आहे. अजित पवार यांनी आज सहाव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
सध्या देशातील 14 राज्यांमध्ये 23 उपमुख्यमंत्री आहे. अनुग्रह नारायण सिन्हा हे भारताचे पहिले उपमुख्यमंत्री मानले जातात. अनुग्रह नारायण सिन्हा हे स्वातंत्र्यापासून जुलै 1957 पर्यंत बिहारचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्यानंतर 1967 मध्ये कर्पूरी ठाकूर यांना बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले.
 
मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये आपली भूमिका निश्चित केली आहे. शपथविधीपूर्वी बुधवारी महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिंदे आणि पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर एकनाथ म्हणाले की, संध्याकाळपर्यंत थांबा, सर्व कळेल. मी उद्या शपथ घेणार आहे, असे अजित पवार गमतीने म्हणाले.  
 
तसेच अजित पवार यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात नोव्हेंबर 2010-सप्टेंबर 2012 आणि ऑक्टोबर 2012-सप्टेंबर 2014 या कालावधीत दोनदा उपमुख्यमंत्रीपद भूषवले आहे. 2019 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा एनडीए सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी सकाळीच राजभवनात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली. पण, हे सरकार केवळ 72 तास चालवू शकले. त्यानंतर, चौथ्यांदा अजित पवार यांनी डिसेंबर 2019 मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील MVA सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी पाचव्यांदा उपमुख्यमंत्री होण्याचा पराक्रम केला. शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते सहभागी झाले. आता अजित पवार यांनी आज म्हणजेच 5 डिसेंबर 2024 रोजी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी आतापर्यंत चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. फडणवीस सरकारमध्ये ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

श्री गुरु दत्तात्रेय आणि इतर आध्यात्मिक अवतारांना आवडणारे पदार्थ

दत्त जयंती विशेष रेसिपी : दत्तगुरूंना आवडणारी घेवड्याची भाजी

काही लोकांना जास्त थंडी का वाजते? कारण जाणून घ्या

दत्तमाला कर्णांकित माघ माहात्म्य

मानवाने पहिल्यांदा कपडे कधी आणि का घालायला सुरुवात केली?

सर्व पहा

नवीन

पैसे आणि दागिन्यांसाठी लोभापोटी निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने केली प्रियसीची हत्या

अमरावतीत चालत्या बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू

LIVE: परभणीतील हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई करीत आतापर्यंत 40 जणांना केली अटक

गडचिरोली न्यायालयात बंदुकीतून गोळी लागल्याने जवानाचा मृत्यू

शिंदे आजारी पडल्यामुळे फडणवीसांनी शहा आणि नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली

पुढील लेख
Show comments