Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जागा वाटपावरून महायुतीत ठिणगी?

Ajit Pawar
Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (07:50 IST)
संपूर्ण देशासह राज्यातही लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. त्यातच जागावाटपावरून आता महायुतीत नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. यावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट आमनेसामने येऊ शकतो. कारण महायुतीत भाजपने एकूण 26 जागा लढविणार असल्याचे म्हटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संकेत दिले. मात्र, त्यानंतर यू टर्न घेत अद्याप जागा वाटप झाले नसल्याचे सांगितले.
 
दरम्यान, जागावाटपाचा हाच फॉम्यूला राहिला तर शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी 11 जागा येऊ शकतात. त्यातच शिंदे गटाकडे असलेल्या मावळ, कोल्हापूर आणि नाशिक या तिन्ही जागांवर अजित पवार गट दावा करणार आहे. यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडू शकते. मावळ, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये विद्यमान खासदार शिंदे गटाचेच आहेत. त्यामुळे शिंदे गट कोणत्याही परिस्थितीत या जागा सोडू शकत नाही. मात्र, या तिन्ही मतदारसंघात अजित पवार गटाची शक्ती मोठी आहे. त्यामुळे याच जागांवर अजित पवार गटही दावा ठोकू शकतो. मात्र, शिंदे गट याला कडाडून विरोध करण्याची शक्यता आहे.
 
मुळात अजित पवार गटाकडे एकच विद्यमान लोकसभा खासदार आहे. त्यामुळे त्यांना जागा सोडण्यावरून शिंदे गट कडाडून विरोध करू शकतो. यातूनच महायुतीत वादाचा भडका उडू शकतो. यातूनही समान जागा वाटपाचा मुद्दा पुढे आल्यास शिंदे गटाला दोन ते तीन जागांचा त्याग करावा लागू शकतो. मात्र, शिंदे गट हे कदापि मान्य करू शकणार नाही. कारण येथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत.
 
फडणवीसांचा यू टर्न
एकीकडे जागा वाटपावरून महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच फडणवीस यांनी यू टर्न घेत जागावाटपाबद्दल अद्याप काहीही ठरले नसल्याचे सांगितले. या अगोदर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे फडणवीस म्हणाले होते. पण या सर्व चर्चांना देवेंद्र फडणवीसांनीच पूर्णविराम दिला.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

१७ वर्षांपासून भारतात राहत होता, पाकिस्तानला पाठवण्याच्या तयारीत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने नागरिकाचे निधन

नागपूर : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असताना फार्महाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू

विक्रोळीत ट्रान्सजेंडर महिलेवर बलात्कार, पोलिसांनी आरोपीला अटक केली

LIVE: इस्रायलचे कॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी यांनी वेव्हज समिट २०२५ ला हजेरी लावली

सीमा हैदरच्या मुलीला मिळाले भारतीय नागरिकत्व ! जन्म प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर एपी सिंग यांचा दावा

पुढील लेख
Show comments