Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परतीच्या पावसाचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

Webdunia
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021 (21:55 IST)
राज्यात परतीचा पावसाने जोरदार धुमाकूळ घातला आहे. कल्याण-डोंबिवलीसह अंबरनाथमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. विदर्भात देखील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा फटका लोकल वाहतूकीला देखील बसला आहे. कल्याण ते कसारा वाहतूक विस्कळीत झाली आहे. 
 
पुणे शहरात झालेल्या पावसामुळे कात्रज, सहकारनगर, शिंदे हायस्कुल, अरणेश्वर, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, एरंडवणा अशा विविध भागात २० ठिकाणी झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत.
 
यंदाच्या वर्षी मान्सूनचं आगमन काही काळ उशिराने झालं असलं तरी राज्यासह देशभरात समाधानकारक पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. त्यामुळे मोठं नुकसानही झालं. यंदाच्या पावसामुळे राज्यात पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध आहे. आता या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

नाशिकात होणाऱ्या भावी सुनेशी वडिलांनी केले लग्न, रागात मुलगा झाला संन्यासी

पालघरमध्ये दोघांनी बंदुकीच्या धाकावर 45 लाखांचे सोन्याचे दागिने लुटले

म्यानमारच्या लष्कराने आपल्याच देशातील एका गावावर केला हवाई हल्ला, 40 जणांचा मृत्यू

विजय हजारे प्री-क्वार्टरफायनलमध्ये मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेतले

IND W vs IRE W: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने आयर्लंडवर सहा गडी राखून विजय मिळवला

पुढील लेख
Show comments