Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबकी बार भाजप तडीपार, हा आपला नारा असला पाहिजे- उद्धव ठाकरें

Webdunia
सोमवार, 4 मार्च 2024 (09:04 IST)
"मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महायुतीचे ४२ खासदार निवडून दिले नसते तर भाजपला दिल्लीचे तख्त राखता आले नसते. मात्र आता भाजपचे तख्त फोडावेच लागेल. अबकी बार भाजप तडीपार, हा आपला नारा असला पाहिजे," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला आहे.
 
धारावीतील भाषणात काय म्हणाले उद्धव ठाकरे?
 
नरेंद्र मोदींसह भाजपवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे की, "ज्यावेळी देशाला लढवय्यांची गरज आहे, त्यावेळी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना झालीय. आता ही लढाई माजवादी विरुद्ध समाजवादी अशी असणार आहे. जनतेने ठरवायचंय, तुम्हाला माजलेले लोकं हवीत की तुम्हाला समजून घेणारे समाजवादी लोकं हवी आहेत? मोदीजी फक्त गावांचं, योजनांचं नाव नाही बदलत तर त्यांनी आता जुमल्याचं नाव पण ‘गॅरंटी’ केलंय. भ्रष्टाचार करा, भाजपमध्ये जा! तुमचा केसही वाकडा होणार नाही, ही ‘मोदी गॅरंटी’ आहे," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. तसंच  हुकूमशाहीला आता एकच पर्याय, लोकशाही वाचवणे. काँग्रेसकडे जर ८०० कोटी असतील, तर भाजपकडे ८००० कोटी आहेत. मग देश कुणी लुटला? असा सवालही उद्धव यांनी विचारला आहे.
 
दरम्यान, "भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नितीन गडकरींचं नाव भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाही, पण भाजपने घोटाळ्याचे आरोप केलेल्या कृपाशंकर सिंह ह्यांचं नाव आहे. ही कुठली गॅरंटी?" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

भाजपच्या विजयानंतर मराठ्यांवर हल्ले वाढले संजय राऊतांचा दावा

LIVE: भाजपच्या विजयानंतर मराठी भाषिकांवर हल्ले वाढले संजय राऊत

भारत जोडो यात्रेबाबत फडणवीसांचे आरोप केंद्र सरकारचे अपयश दर्शवणारे आहे आदित्य ठाकरे यांचे विधान

विराट कोहली आणि अनुष्का देश सोडणार!

IND W vs WI W: भारताने निर्णायक सामन्यात 60 धावांनी विजय मिळवला

पुढील लेख
Show comments