Dharma Sangrah

अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; हल्लेखोराचीही आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2024 (09:05 IST)
शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आहेत. दरम्यान, हल्लेखोरानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर, हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना  करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर शिवसेनेच्या यूबीटी गटाच्या शिवसनिकांनी निषेधार्थ मॉरीसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे.
घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलिस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
हल्लेखोर मोरीस याचाही मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अभिषेक यांची हत्या ही पूर्वनियोजित असल्याचा तपास अधिकाऱ्यांचा संशय असून दहिसर पोलीस तसेच क्राइम ब्रांच या प्रकरणी तपास करत आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार नाव एफआयआरमध्ये जोडले जाणार?

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

पुढील लेख
Show comments