Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Accident: बुलेटवर बसलेल्या महिलेचा ओढणीने घेतला जीव

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (10:02 IST)
गाडीवर बसताना नेहमी सावधगिरी बाळगावी असे सांगितले जाते. गाडीवर नेहमी व्यवस्थित कपडे परिधान करावे. ओढणी नीट बांधावी जेणे करून गाडी चालवताना काही अपघात  होऊ नये. ओढणीमुळे गळफास लागून एका महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना मुंबई -अहमदाबाद महामार्गावर घडली आहे. 

सदर घटना मुंबई -अहमदाबाद महामार्गावर बुलेटवरून हे पती पत्नी येत वसई बाफाणे हद्दीत आले असताना घडली. या अपघात पत्नीचा ओढणीने गळफास लागून मृत्यू झाला. प्रतिमा यादव असे या मयत महिलेचे नाव आहे. 
कांदिवली पश्चिम ईराणीवाडी नंबर 04, ठाकूर चाळ, लक्ष्मी निवास मध्ये राहणारे यादव मनीष यादव आणि प्रतिमा यादव हे पती पत्नी रविवारची सुट्टी असल्यामुळे कांदिवलीतून वसईच्या तुंगारेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी बुलेटवरून निघाले. दर्शन घेऊन मुंबई- अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत आले असता प्रतिमांच्या गळ्यातील ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली. गाडीच्या चाकात ओढणी अडकल्यामुळे तिला गळफास लागला आणि ती बुलेट वरून  खाली पडली. खाली पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला. तिला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे ठाकूरचाळीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments