Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदित्य ठाकरे शिवसेना नेते, तर शिवसनेना २०१९ची निवडणूक स्वबळावर लढणार

Webdunia
मंगळवार, 23 जानेवारी 2018 (15:20 IST)
अहमदाबादेत पतंग उडवण्यापेक्षा, लाल चौकात नेऊन तिरंगा फडकवला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अभिमान वाटला असता. केवळ 56 इंचाची छाती असून उपयोग नाही, त्यात किती शौर्य आहे, अशी जहरी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
 
शिवसेनेची नवी कार्यकारिणी
या बैठकीत शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यंदा नेतेपदी पाच नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली. यामध्ये आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.
शिवसेनेचे एकूण 13 नेते असतील
•मनोहर जोशी •सुधीर जोशी •लीलाधर ढाके •दिवाकर रावते •संजय राऊत •  रामदास कदम •गजानन कीर्तीकर •सुभाष देसाई
 
नवीन नियुक्ती
•आदित्य ठाकरे •एकनाथ शिंदे •चंद्रकांत खैरे •आनंदराव अडसूळ •अनंत गीते
 
शिवसेना सचिव - मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण.
प्रवक्ते - अरविंद सावंत, निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, अमोल कोल्हे, अनिल परब
दैनिक सामनातील उद्धव ठाकरे यांचे सविस्तर भाषण : आज शेतकऱ्यांची कर्जमाफी, आत्मसन्मान योजना, अशा अनेक योजनांच्या जाहिराती फक्त झळकतात. पण प्रत्यक्षात योजनांचा फायदा झालेले कुणीच सापडत नाही. त्यामुळे असं केवळ जाहिरातबाजीचं सरकार खाली खेचावच लागेल आणि शिवशाहीचं सरकार आणावं लागेल, अशा खणखणीत शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारवर शरसंधान केले. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मुंबईतली वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात सभा पार पडली. यासभेत शिवसेना नेते आणि अन्य पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. तसेच अन्य महत्वाच्या ठरावांसह शिवसेना स्वबळावरच पुढल्या निवडणुका लढणार हा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडलेला ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उभे राहिले आणि त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर तारेशे ओढले.आजच्या कार्यकारिणीत झालेले ठराव म्हणजे नुसते डराव, डराव नाही, औपचारिकता म्हणून झालेले ठराव नाही. ते आपल्या सर्वांच्या संमतीने झाले आहेत. मराठी माणसांचं आणि हिंदुंचं स्वप्न मला तुमच्या सोबतीनं पूर्ण करायचे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.सरदार वल्लभभाई पटेल आपल्या देशाच पोलादी पुरुष होते. पण ते जर आजच्या सरकार सारखे असते तर मराठवाडाही आपल्या देशात आला नसता. याउलट आज सरदार पटेल असते तर कश्मीर, बांगलादेश, पाकिस्तान सगळे प्रश्न केव्हाच संपले असते, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.आतापर्यंत आम्ही फक्त ऐकतच आलो आहे की, एक मुंडकं कापलं तर आम्ही दहा कापू, एक गोळी मारली तर दहा गोळ्या मारू… कसल्या लिमलेटच्या? नुसतं घुसू… घुसू… सुरू आहे. त्यापेक्षा एकदाच काय तो हल्ला करा आणि पाकिस्तानला कायमचा नेस्तनाबूत करा, असं आव्हान त्यांनी दिलं.
 
५६ इंचाच्या छातीत शौर्य किती?
प्रत्यक्षात सीमेवर रोज सैनिक मरताहेत. पण त्याची पर्वा कुणालाच नाही. उलट संताप याचा येतो की, देशासाठी बलिदान करणाऱ्यांना सत्तेची मस्ती दाखवली जाते आहे. नितीन गडकरी म्हणतात की, हम सरकार है, इथे नेव्हीचं काय काम?, ही सत्तेची मस्ती कोणाला दाखवता? तुम्हाला काही सांगायचे असेल तर त्यांना एकांतात सांगा, मात्र चार चौघात अपमान करू नका आणि सर्जिकल स्ट्राईकचं श्रेयही घेऊ नका. केवळ ५६ इंचाची छाती असं बोलून चालणार नाही. ५६ इंचाची छाती महत्वाची नाही, तर त्या छातीमध्ये शौर्यही असणं अधिक महत्वाचं असा, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावाला.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments