Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वन नेशन वन इलेक्शनवरून आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Webdunia
गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (10:46 IST)
वन नेशन-वन इलेक्शनवरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपला धारेवर धरले आहे ते म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकाच वेळी होत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक टप्प्यांत निवडणुका होत आहे, त्याही सुरक्षेच्या कारणास्तव. महाराष्ट्रात अजून अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होत नाही आणि आता हे लोक वन नेशन वन इलेक्शनच्या गप्पा मारत आहे.भाजपला निवडणुकीची भीती वाटते.
 
मिळालेल्या माहितीनुसार ते पुढे म्हणाले की, आमचा पक्ष म्हणतो की मंत्रिमंडळात शिफारसी ठेवण्यापूर्वी या लोकांनी कोणाशी चर्चा केली? निवडणूक आयोग हा एक विनोद आहे. यानंतर त्याने बांगलादेश क्रिकेट संघाच्या दौऱ्यावरही प्रश्न उपस्थित केले.
 
जेव्हा-जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा आपल्या देशात हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, असे आदित्य ठाकरे म्हणाले. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे की नाही हे भाजपने सांगावे. भाजप फक्त निवडणुकीसाठी हिंदूंचा वापर करते का? बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत असल्याचेही आपण सोशल मीडियावर पाहिले आहे. दोन दिवसांत कसोटी सामना होणार असून बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले आहे की नाही, याचा खुलासा भाजपला करावा लागणार आहे.
 
तसेच महाराष्ट्रात होत असलेल्या गुन्ह्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, नागपुरात 9 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला, तरीही मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर सेलिब्रिटींसोबत फोटो काढण्यात व्यस्त आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

कोळशाने भरलेल्या मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

गडचिरोलीत सरकारी रुग्णवाहिकेतून दारू तस्करी, डॉक्टर समवेत तिघांना अटक

सायबर धमकी आणि मानहानीचा गुन्हा, सौरभ गांगुलीची पोलिसांकडे तक्रार

सीएम चंद्राबाबू नायडूंचा मोठा आरोप, "तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी वापरली गेली"

राहुल गांधींबद्दल अपशब्द उच्चारले, भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments