Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता लायक व्यक्ती नेमा : आदित्य ठाकरे

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (10:18 IST)

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.   संजय देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवले आहे. आता सरकारने पुन्हा चूक करु नये आणि या पदावर लायक व्यक्ती नेमावी अशी मागणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. कुलगुरु जबाबदारीतून मुक्त झाले, पण विद्यार्थ्यांचे जे नुकसान झाले, वर्ष वाया गेले आणि मनस्ताप झाला, त्याची भरपाई सरकार कशी करणार असा सवालही त्यांनी विचारला आहे.

ऑनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे वादग्रस्त ठरलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची मंगळवारी पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. अक्षम्य निष्काळजीपणा आणि ऑनस्क्रीन मूल्यांकनाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवून राज्यपालांनी देशमुख यांना कुलगुरुपदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. मुंबई विद्यापीठाच्या १५० वर्षांच्या इतिहासात कुलगुरुंची हकालपट्टी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

त्यानंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: युसूफ अन्सारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र मुघलांच्या अधिपत्याखाली आहे, भाजपच्या मानसिकतेवर आदित्य ठाकरेंचे मोठे विधान

आंध्र प्रदेशातील फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू

अमित शहांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी, म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला

शरद पवार आणि अजित पवार सातारा येथील एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर

पुढील लेख
Show comments