Dharma Sangrah

४८ पैकी ४४ जागा वाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत

Webdunia
मंगळवार, 29 जानेवारी 2019 (10:15 IST)
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४४ जागा वाटपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत होऊन निर्णय झाला आहे. उरलेल्या जागावाटपाचा निर्णयही लवकरच होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेनिमित्त अजित पवार कोल्हापूरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल माहिती दिली.
 
ते म्हणाले, ४४ जागावाटपावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असून निर्णय झाला आहे. आता उर्वरित चार जागांचा निर्णय झाला की दोन्ही पक्ष एकत्रितपणे जागावाटपाची माहिती देतील आणि आघाडीची औपचारिक घोषणाही होईल. आघाडीमध्ये कोल्हापूरप्रमाणे साताऱ्याच्या जागेबाबतही काहीशी धुसफूस होती. मात्र, तिथेही आता मनोमिलन झाले आहे. काही लोकांची मागणीच जास्त असल्यामुळे जागा वाटपाचा विषय प्रलंबित राहतो. पण लवकरच त्यावर तोडगा काढला जाईल. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मागितलेल्या १२ जागांच्या मागणीवरही सध्या चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली

नाशिक : एका मोठ्या आयटी कंपनीत धर्मांतर रॅकेट: ९ पीडित समोर; सहा टीम लीडर्सना अटक

माजी भारतीय क्रिकेटपटूचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन

पराभवानंतर मिलर ढसाढसा रडला

बारामती पोटनिवडणूक: सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा, काँग्रेसची माघार; आता अपक्षांशीच लढत!

पुढील लेख
Show comments