Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे तुम्ही सोबत या अजित पवार यांची ऑफर

Webdunia
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (16:27 IST)
निवडणुका जवळ येत असून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मतांचे विभाजन होवू नये म्हणून सर्वच पक्ष उमेदवार प्रयत्न करत आहेत. त्यातच आता मतांचं विभाजन टाळण्यासाठी मनसेनं आमच्यासोबत यावं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. मनसेला राष्ट्रवादीने सोबत येण्याची ऑफरच दिली आहे असंच या वक्तव्यावरून दिसतं आहे. अजून राज ठाकरे यांची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सोबतच  राजू शेट्टींचे मतभेदही दूर करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.एका खासगी मराठ  वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. काही दिवसांपासून राज ठाकरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेटी घेताना दिसत आहेत. छगन भुजबळ यांनीही कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे राष्ट्रवादी एकत्र येणार का? या चर्चां रंगली आहे. अजित पवारांनीच मनसेला सोबत येण्यासाठी हात पुढे केला आहे. भाजपा विरोधात लढायचं असेल तर सेक्युलर विचार मानणाऱ्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे. तसेच मनसे सोबत आल्यास मतांचं विभाजन टळेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे जर सोबत गेले तर मोठे राजकीय गणित बदलणार आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments