दिवेआगार येथे गेल्या दोन दिवसांपासून समुद्रकिनारी शिपल्यांचा सडा पसरला असून ते वेचण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. समुद्र किनारी शिंपल्याची चादर पसरल्यासारखे दृश्य यामुळे तयार झाले आहे. समुद्रात आठवड्यापूर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला होता. बदललेल्या वातावरणामुळे समुद्रातील छोटे जीवजंतू हे समुद्रकिनारी लाटांद्वारे आलेले आहेत. या लाटांच्या वेगाने शिंपले हे समुद्र किनारी आलेले आहेत.
दिवेआगर किनारी शिंपले नेहमी येत असतात. यावेळी हे प्रमाण अधिक आहे. वायू चक्रीवादळाने समुद्र खवळलेला होता. तर किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी होते. चक्रीवादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावरील पाणी ओसरल्याने वाळूत रुतून राहिलेले शिंपले समुद्र किनारी दिसू लागले आहेत.