Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सैन्य दलाच्या गाडीला अपघात, सांगलीतील सुपुत्राचा दुर्दैवी मृत्यू

Webdunia
बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (21:07 IST)
जबलपूर : पाठीमागून आलेल्या एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जबलपूरहून बंगळूरूला जाणाऱ्या सैन्य दलाच्या गाडीला हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सांगलीच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र आणि पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांचा सहकारी एक जवान गंभीर जखमी आहे. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात झाला.
 
रुग्णालयात पोहचण्याचा अगोदर पोपट खोत यांची प्राणज्योत मालवली. पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
 
पोपट खोत हे 34 वर्ष वयाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि बहिणी असा परिवार आहे. पोपट खोत यांचं पार्थिव त्यांच्या गावी लोणारवाडी येथे आणलं जात आहे. कर्त्यव्य बजावत असताना, पोपट खोत यांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  पोपट खोत यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी  आणण्यात येणार आहे. निधनाच्या बातमीने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  मृत्यूची माहिती मिळताच आईचा आणि पत्नीचा आक्रोश हृदय पिळवटणार आक्रोश होता.
 
अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या पोपट यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. मृत पोपट खोत यांची परिसरात  गुणवत्तेची प्रशंसा होत असे. मात्र आता त्याच्या अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.















Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस नेता प्रफुल्ल गुडधे यांची उच्च न्यायालयात धाव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस नेता प्रफुल्ल गुडधे यांची उच्च न्यायालयात धाव

मुंबईत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पीटी शिक्षकाला अटक

नागपूरच्या व्यावसायिकाची दाम्पत्याकडून 7.63 कोटींची फसवणूक

बीड सरपंच हत्येप्रकरणी दोषींना सोडले जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments