Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरात दृष्यम चित्रपटाप्रमाणे हत्येनंतर लष्कराच्या जवानाने प्रेयसीचा मृतदेह पुरला

Webdunia
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (20:07 IST)
नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे लष्कराच्या एका जवानाने दृष्यम चित्रपटाच्या धर्तीवर आपल्या मैत्रिणीची हत्या करून मृतदेह पुरला. तब्बल 52 दिवसांनी हे प्रकरण उघडकीस आले. 
 
आर्मी फार्मासिस्टने आपल्या मैत्रिणीची हत्या करून तिचा मृतदेह पुरला होता. महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नागपूरच्या बेलतरोडी पोलिसात दाखल करण्यात आली होती. तब्बल ५२ दिवसांनी सत्य समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी अजय वानखेडे याला अटक केली आहे.

अजय हा आर्मी हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट आहे. तो नागालँडमध्ये तैनात होता आणि तो विवाहितही आहे, तर ज्योत्स्ना घटस्फोटित होती. दोघांची भेट एका वेबसाईटच्या माध्यमातून झाली होती, ज्योत्स्ना अजयवर लग्नासाठी दबाव टाकत होती.
 
याच कारणावरून आरोपींनी 28 ऑगस्टच्या रात्री ज्योत्स्ना यांची हत्या केली. खून केल्यानंतर मृतदेह बुटीबोरी परिसरात पुरण्यात आला. मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर प्लॅस्टर करून जमिनीला पक्के केले जेणे  करून  कोणालाही संशय येऊ नये. 
 
पोलिसांनी ज्योत्सनाचा मोबाईल शोधण्यास सुरुवात केली असता, त्याचे लोकेशन हैदराबादमधील बालाघाट येथे आढळून आले. तो फोन ट्रकचालक वापरत होता. ट्रकमध्ये फोन सापडल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीपासूनच कुटुंबीयांना अजयवर संशय होता.त्याला पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

पोलिसांचा दाट संशय अजय वर होता. महिलेच्या बेपत्ता   झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली. अपहरण आणि खून झाल्याचा पोलिसांना संशय होता. ज्योत्स्ना घटस्फोट घेतल्यानंतर ती आई-वडील, भाऊ आणि नातेवाईकांसोबत राहत होती.

अजयने एप्रिल 2024 मध्ये त्याच्याशी संपर्क साधला, दोघांचे बोलणे सुरू झाले आणि त्यांची मैत्री आणखी घट्ट होऊ लागली. 28 ऑगस्ट रोजी ती कामासाठी घराबाहेर पडली होती आणि त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ती अजयावर लग्नासाठी दबाब आणतहोती त्यामुळे त्याने तिचा खून करून मृतदेह पुरले. आरोपीला अटक केली आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments