Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज १६ फेब्रुवारी पासून भरता येणार

Webdunia
बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (08:06 IST)
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार दि. ०१ फेब्रुवारी २०२२ पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज दि. ०१ फेब्रुवारी २०२२ ऐवजी बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ पासून भरता येतील, संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
 
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
 
याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील. पोर्टलवरील वेळोवेळी दिलेल्या सूचनांची सर्व संबंधितांती नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही शिक्षक संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

संबंधित माहिती

नागपूर स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट प्रकरणात मृतांची संख्या नऊ वर

धारावीची जमीन महाराष्ट्र सरकारच्या खात्यांना हस्तांतरित होणार,अदानी समूह फक्त पुनर्विकास करणार

इलॉन मस्कनंतर राहुल गांधींनीही EVM वर वक्तव्य केलं, म्हणाले-

शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल

ठाण्यात घरातून 17.2 लाख रुपयांचे चरस जप्त, एकाला अटक

क्रिकेट सट्टेबाजीचे कर्ज फेडण्यासाठी महिलेची हत्या, आरोपीला अटक

रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला, गुन्हा दाखल

रात्री झोपेत छताचे प्लास्टर अंगावर पडून तिघे जखमी

पाटण्यात बोटीचा अपघात, 17 बुडाले, कुटुंबातील चार जण बेपत्ता

TDP ला लोकसभा अध्यक्षपद मिळाले नाही तर भारत आघाडी त्यांना पाठिंबा देईल, संजय राऊतांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments