Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपचा शिवसेनेला दे धक्का, आशाताई बुचके यांचा भाजपमध्ये प्रवेश

asha tai buchke in BJP
Webdunia
गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (15:58 IST)
भाजपने शिवसेनेला  दे धक्का देत  पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई बुचके  यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांच्या उपस्थितीत मुंबईत आशा बुचके यांनी पक्षप्रवेश केला आहे.  जवळपास 15 वर्ष त्यांनी शिवसेनेचे काम केले होते, मात्र 2019मधील लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जुन्नर तालुक्यात मोठा राजकीय बदल शिवसेनेने केला होता. महिलांचे मोठ नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते. आशा बुचके यांची शिवसेनेकडून हकालपट्टी करण्यात आली होती. 
 
आशाताई बुचके या पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या माजी गटनेत्या आहेत. आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेचे तत्कालीन आमदार बाळासाहेब दांगट यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यावर आशाताई बुचके यांच्याकडे जुन्नर तालुक्यातील शिवसेनेचे नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली होती.
 
2014 मध्ये आशाताई बुचके यांनी शिवसेनेकडून जुन्नर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र केवळ पाच हजार मतांच्या फरकाने त्यांना मनसेच्या शरद सोनावणेंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार शरद सोनवणे शिवसेनेत आले आणि त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. त्यानंतर बुचकेंनी अपक्ष निवडणूक लढवत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

जालन्यात स्वतःच्या मुलीची निर्घृण हत्या करणाऱ्या आई वडिलांना अटक

SRH vs MI: एकतर्फी सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव केला

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार

'पाणीपुरी' खाल्ल्यानंतर विषबाधा, नांदेडमधील ३१ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

LIVE: नांदेड मध्ये 'पाणीपुरी' खाल्ल्यानंतर विद्यार्थी आजारी पडले

पुढील लेख
Show comments