Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न, ऑडीओ क्लीप व्हायरल

eknath shinde
Webdunia
सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (15:50 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज  संभाजीनगरच्या पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यांच्या याच दौऱ्याची जोरदार तयारी शिंदे गटाकडून सुरु असताना कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यकर्त्यांची एक ऑडीओ क्लीप व्हायरल  झाली आहे.
 
या ऑडीओ क्लीप  मध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अडीचशे ते 300 रुपये देऊन महिलांना सभेसाठी आणण्याचे असे देखील ऑडिओ क्लीपमध्ये  संभाषण आहे. ही ऑडिओ क्लीप कधीची आहे? आताची आहे की जुनी आहे? हे स्पष्ट होत नाही .
 
या ऑडिओमध्ये "आपण 400 रुपये पण दिले असते पण पैशाचा विषय त्यांच्या हातात आहे. भाऊ पैसे ते देणार की तुम्ही देणार..., नाहीतर तिथे गेल्यावर असं नाही झालं पाहिजे. पैसे कोण देणार? आपल्याकडे त्यांनी अडीच लाख रुपये पाठवले होते. बरं का...मी सचिनलाही म्हटलं भाऊ.. आपल्याकडे नको घेऊ पैसे... नाहीतर अर्धे खाल्ले आणि अर्धे दिले, अशा पध्दतीचा आरोप होतोय... तुम्ही पण करोडपती आहे त्यामुळे पैशाची चिंता नाही तसं..." असे संभाषण करण्यात आले.  हे संभाषण कुणाचे आहे ते अद्याप कळू शकलं नाहीये. पण, भुमरेंच्या मुलाचा उल्लेख ऑडिओ क्लीपमध्ये करण्यात आलाय. सभेला गर्दी जमा करण्यासाठीची ही बातचीत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एअरटेल: 10 मिनिटांत तुमच्या घरी एअरटेलची सिम पोहोचेल, एअरटेलने 16शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली

कराडला मारण्यासाठी 10 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा निलंबित पोलीस अधिकारी कासले यांचा खुलासा

फडणवीस सरकारने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय

जागतिक आवाज दिन 2025: जागतिक आवाज दिन का साजरा करतात, महत्त्व जाणून घ्या

LIVE: फडणवीस सरकारने घेतले 7 महत्त्वाचे निर्णय

पुढील लेख
Show comments