Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नरेंद्र मोदींच्या गावाजवळ औरंगजेबचा जन्म, तशीच विचारसरणी, संजय राऊतांचे बिघडले बोल

Webdunia
शिवसेनेचे संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी पंतप्रधानांची तुलना औरंगजेबाशी केली. संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाची विचारसरणी गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर आक्रमण करत आहे. शिवाजी महाराज महाराष्ट्रात तर मुघल सम्राट औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला, असे संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी यांचा ज्या गावात जन्म झाला, त्या शेजारच्या गावात औरंगजेबचा जन्म झाला. त्यामुळे औरंगजेबाची विचारसरणी गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर आक्रमण करत आहे.
 
ज्या प्रकारचे काम औरंगजेब करायचा, लोकांना घाबरवायचा, त्यांच्यात फूट पाडायचा, तेच काम आता ते (मोदी आणि शहा) करत आहेत, पण मला एका गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की तुमचा आणि माझा जन्म त्या मातीत झाला जिथे छत्रपती महाराज शिवाजी यांचा जन्म झाला.
 
राज्यातील बुलढाणा येथील सभेत संजय राऊत यांनी हे विधान केले. त्यावेळेस उद्धव ठाकरे देखील मंचावर उपस्थित होते. राऊत म्हणाले की मोदींचा जन्म औरंगजेब जन्माला आला तिथला असल्यामुळे औरंगजेबाची मानसिकतेचा आमच्यावर हल्ला होतो.

संबंधित माहिती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट खाली कोसळली बस,1 चा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की कट?

महाराष्ट्रातील आकोल्यामध्ये 2 बाईकची समोरासमोर धडक झाल्याने 2 चिमुकल्यांसोबत 3 लोकांचा मृत्यू

पुण्यामध्ये अनियंत्रित कारने दिलेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

पहिले आरएसएस ची गरज होती, आता भाजप स्वतः सक्षम- जेपी नड्डा यांचा जबाब

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू?

एकाच तरुणाने केले 8 वेळा मतदान!एफआयआर नोंदवला

मतदानापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नोटीस देऊन उठवत आहे पोलीस- शिवसेना(युबीटी)चा आरोप

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ कंटेनर अपघातानंतर आग;एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments