Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बच्चू कडू यांनी अमरावती येथे ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली

Webdunia
बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (21:13 IST)
प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी आणि मजुरांच्या विविध प्रश्नांवरून बच्चू कडू यांनी अमरावती येथे ‘जन एल्गार मोर्चा’ची हाक दिली आहे. अमरावती येथे केलेल्या भाषणातून बच्चू कडू यांनी मंत्रालयातील कृषी सचिवांच्या कार्यालयात साप सोडण्याचा इशारा दिला आहे. मजुरांच्या प्रश्नांवर पुढील १५ दिवसांत तोडगा काढा, अथवा मंत्रालयात साप सोडू, असं विधान बच्चू कडू यांनी केलं.
 
शेतकरी आणि मजुरांच्या प्रश्नांवर भाषण करताना बच्चू कडू म्हणाले, “गावातल्या मजुरांसाठी एकही योजना नाही. शेतकऱ्याला साप चावला तर त्यांच्यासाठी विमा आहे. पण मजुराला साप चावला तर त्याला पैसे मिळत नाहीत. यावर आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पैसे देण्यास होकार दर्शवला. पण मंत्र्यालयातील कृषी सचिव ढवळे याला आडवा येत आहे.”
    
“त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही कृषी सचिवाला इशारा देतोय की, त्यांनी पंधरा दिवसांत यावर तोडगा काढावा. अन्यथा आम्ही मंत्रालयातील सचिव कार्यालयात साप सोडल्याशिवाय राहणार नाही. सापाला काही जात, धर्म किंवा पंथ नसतो. एका गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार आणि दुसऱ्या गावात मजुराला साप चावला तर पैसे मिळणार नाहीत, हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतात राब-राब राबणाऱ्या मजुराला मदत झालीच पाहिजे” असंही बच्चू कडू म्हणाले.  
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

36 वर्षांच्या महिलेला अजगराने गिळलं

मी नाही साडी नेसत जा!', नैतिकता, संस्कृतीचे निकष महिलांच्या कपड्यापाशीच येऊन का थांबतात?

Hathras Stampede:हातरस दुर्घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुरतमध्ये भीषण अपघात, सहा मजली इमारत कोसळली,15 जण जखमी

Ind vs zim : अभिषेक शर्माच्या नावावर लज्जास्पद विक्रम,पदार्पणातच फ्लॉप

सर्व पहा

नवीन

IND vs ZIM:पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वे कडून भारताचा 13 धावांनी पराभव

मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा

Budget Session: आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर, 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार

पुढील लेख
Show comments