Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बच्चू कडू सचिन तेंडुलकरला पाठवणार लिगल नोटीस..!

Webdunia
मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (08:27 IST)
माजी मंत्री बच्चू कडू हे त्यांच्या बेधडक आणि सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात. बच्चू कडूंच्या विधानांमुळे अनेकदा मित्रपक्षांची पंचाईत ही झाल्याचे दिसून आले आहे. आता बच्च कडू थेट सचिन तेंडुलकरला नोटीस धाडणार आहे. 30 ऑगस्टला कडू त्यांच्या वकिलाकरवी तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठविणार आहेत.
 
सचिनने ऑनलाईन जाहिरातीतून माघार घ्यावी, नाहीतर त्यांचा घरासमोर आंदोलन करु, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. बच्चू कडू यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र दिलं होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
 
काय म्हणाले बच्चू कडू?
आमदार बच्चू कडू म्हणाले की, भारतरत्न सचिन तेंडुलकर हे ऑनलाईन गेमबाबतची जाहिरात करतात. त्यामुळे युवा पिढी अशा खेळांकडे आकर्षित होते. पैशासाठी अशी जाहिरात करणे योग्य नाही. त्यांनी अशा जाहिराती करु नये अशी आम्ही त्यांना यापूर्वी विनंती केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे युवा वर्ग प्रभावित होतो, असे कडू यांनी स्पष्ट केले आहे. आपण सचिन तेंडुलकर यांना दिलेला वेळ संपत आलेला असून वकिलाकडून नोटीस पाठवण्याची तयारी पूर्ण करण्यात आलीय. 30 ऑगस्ट रोजी नोटीस पाठवण्यात येईल.
 
सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांना वचन दिल्यामुळे आपण आजपर्यंत पानमसाला, गुटखा, तंबाकू यांच्या जाहिराती केल्या नसल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. मात्र, तरीही त्याने केलेल्या एका जाहिरातीवरून बच्चू कडू संतप्त झाले आहेत. त्याने ऑनलाईन गेमची जाहिरात केली आहे. या जाहिरातीलाच आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा विरोध आहे. बच्चू कडूंच्या राजकीय धोरणांची माध्यमांमध्ये कायमच चर्चा असते. पण आता थेट भारतरत्न सचिन तेंडुलकरलाच ते नोटीस पाठवणार असल्यामुळे त्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

संजय राऊत गद्दार, अरविंद सावंत आणि वर्षा गायकवाड यांच्या विरोधात देखील पोस्टर

LIVE: तहव्वुर राणाला ताबडतोब फाशी द्या: विजय वडेट्टीवार

Tahawwur Rana: तहव्वुर राणा भारतीय भूमीवर पाऊल ठेवताच NIA च्या ताब्यात, पटियाला न्यायालय आणि तिहारची सुरक्षा वाढवली

सासू जावयासह पळून गेली, घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन गेली

भंडारा येथे एसडीओसह तहसीलदार निलंबित, वाळू उत्खनन प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला इशारा

पुढील लेख
Show comments