Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, मुंबई पोलिसांच्या व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अश्लील व्हिडीओ

Webdunia
शनिवार, 7 जानेवारी 2023 (21:17 IST)
मुंबईत एका पोलीस कर्मचाऱ्यानेच अश्लील व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. या कृतीमुळे पोलीस कर्मचाऱ्याला आपली नोकरी गमवावी लागली आहे. घटनेची माहिती मिळताच सर्वांनाच धक्का बसला. मुंबई पोलीस दलातील एक कर्मचारी हा नो पॉलिटिकल मॅसेज या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा सदस्य होता. या ग्रुपवर अश्लील व्हिडिओ शेअर केले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे या ग्रुपमध्ये अनेक पोलीस कर्मचारी सहभागी आहेत. 9 डिसेंबर रोजी या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःचा एक अश्लील व्हिडीओ ग्रुपमध्ये शेअर केला होता.

हा व्हिडीओ इतरांसह ग्रुपमध्ये असलेल्या इतर पोलिसांनी पाहिला होता. मात्र या व्हिडीओमध्ये असणारी महिला ही त्याच ग्रुपमध्ये असणाऱ्या एका दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी होती. व्हिडीओ पाहिल्यानंतर इतर सदस्यांनाही धक्का बसला.
 
व्हिडीओमध्ये जी महिला होती त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीकडे याबाबत चौकशी केली. तसेच पत्नीला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेल्या व्हिडीओवरुन सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची तक्रार करण्यास सांगितले. मात्र पत्नीने असे करण्यास नकार दिला. त्यनंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याने 9 डिसेंबर रोजी व्हिडीओ पाठवणारा पोलीस कर्मचारी, त्याची पत्नी आणि पॉलिटिकल मेसेज नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्या ग्रुपमध्ये 126 पोलीस कर्मचारी होते.

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख