Dharma Sangrah

बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका

Webdunia
शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (21:48 IST)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे  यांना सध्या युती करायला कुणी मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडला सोबत घेतलं आहे. संभाजी ब्रिगेडने 2019ला 40 जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांना 0.06 टक्के मतं मिळाली होती. उद्धवजींनी केवळ 0.06 टक्के मते घेणाऱ्या पक्षासोबत युती करावी लागत आहे. ज्यांचे अस्तित्व नाही, असेच पार्टनर त्यांना मिळतील. संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरेंनी फुसकाबार सोडला आहे, अशी टीका करतानाच उद्धव ठाकरेंना शेवटची घरघर लागली आहे. त्यांचा वाईट काळ जवळ आला आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
 
अडीच वर्षात जनतेची दुर्गती कशी झाली हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुठलाही पक्ष त्यांच्यासोबत युती करायला तयार नाहीये. त्यांचे तीन पार्टनर पळून जात आहेत. उद्धव ठाकरे यांना शेवटची घर घर लागली आहे. सध्या उद्धवजींसाठी वाईट काळ आलाय, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

न विचारता रसगुल्ले खाल्ल्यामुळे केटररने मुलाला धगधगत्या तंदूरमध्ये फेकले

TCS नाशिक प्रकरण: निदा खान गरोदर असल्याचे निष्पन्न, फरार नसून मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहत असल्याचे वकिलांचे म्हणणे

आई घरात नसताना मैत्रिणीला बोलवून तिच्यावर बलात्कार केले, आरोपीला अटक

LIVE: नितीन राऊत यांनी पक्ष सोडण्याची धमकी दिली

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दिल्लीत 'एकाच ताटात'? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात भूकंप

पुढील लेख
Show comments