Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

BEST चा पर्यटकांना धक्का : ओपन डेक बस हद्दपार होणार, या तारखेपासून 'मुंबई दर्शन' बंद

Webdunia
मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 (21:15 IST)
मुंबई : मुंबईला ऐतिहासिक वास्तूंचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे हे शहर आंतरराज्य, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. अशातच आता मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली डबल डेकर ओपन डेक बस पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरपासून हद्दपार होणार आहे. बेस प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईत फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा धक्का बसला आहे.
 
दरम्यान ओपन डेक बसमधून होणारे 'मुंबई दर्शन' 5 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. त्यानंतर ओपन डेक बस चालवण्याचा सध्यातरी कुठलाही विचार बेस्ट उपक्रमाचा नसल्याचा सांगण्यात आलं आहे. बेस प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईत फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा मानला जात आहे.  सध्या सेवेत असलेल्या तिन्ही ओपन डेक बसचा आयुर्मान संपल्यामुळे या जुन्या बस आता हद्दपार होणार आहेत. 50 नवीन ओपन डेक बस खरेदीसाठी काढलेली निविदा रद्द केल्याने बेस्टच्या माध्यमातून केले जाणारे 'मुंबई दर्शन' ऑक्टोबरपासून बंद होणार आहे.
 
मुंबईतील पर्यटनाला चालना मिळावी आणि मुंबईत आलेल्या पर्यटकांना शहरातील पर्यटन स्थळे बसमधून झटपट पाहता यावी यासाठी 26 जानेवारी 1997 पासून एमटीडीसीच्या मदतीने ओपन डेक बस सेवा सुरु करण्यात आली होती.
 
दर महिन्याला जवळपास 20 हजार पर्यटक या बस सेवेचा लाभ घेत असल्याची आकडेवारी आहे.सध्या बेस्टकडे 3 डबल डेकर ओपन डेक बस आहेत. मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात या तिन्ही बस टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाकडून घेण्यात आला आहे.
 
ओपन डेक बसमधून पर्यटकांचं 'मुंबई दर्शन'
ही ओपन डेक बस नॉन एसी आहे. यात अप्पर डेक आणि लोअर डेक असतात. अप्पर डेक आणि लोअर डेकचं भाडं वेगळं आहे. अप्पर डेक ओपन असल्याने यातून मुंबईची सफर करता येते. जेव्हा ही गाडी सुरु झाली तेव्हा मुंबईतील पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट दिली जात असे. मात्र आता दक्षिण मुंबईमधील पर्यटन स्थळं या बसच्या माध्यमातून पाहता येत होत्या.
 
'या' ठिकाणांची सफर
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना ओपन डेक बसेसमधून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, सीएसएमटी, बीएमसी, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, आरबीआय, एशियाटिक लायब्ररी, जुनं कस्टम हाऊस, एनसीपीए, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई हायकोर्ट आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणांची सफर घडवण्यात येत होती.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची किंमत निश्चित, बाईक-ऑटोसाठी एवढी किंमत मोजावी लागेल

बीडच्या नक्षलवाद्यांवर फडणवीस कारवाई करणार का? सरपंच हत्येप्रकरणी संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

LIVE: उद्योगांसह सर्वांना स्वस्त वीज उपलब्ध करून दिली जाईल म्हणाले फडणवीस

BMC Election 2025: मुंबईत शिवसेनेचा युबीटीचा आधार किती ? बीएमसी निवडणुकीपूर्वी उद्धव यांनी तीन दिवसांचा आढावा घेतला

ठाण्यामध्ये वृध्द दाम्पत्याला आत्महत्या कारण्यापासून मनपा कर्मचारी आणि पोलिसांनी रोखले

पुढील लेख
Show comments