Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bhendwal Ghat Mandani : काय आहे भेंडवळ घटमांडणी ? काय आहे २०२३ चे राजकीय भविष्य व पर्जन्यमान अंदाज ?

Webdunia
सोमवार, 24 एप्रिल 2023 (15:22 IST)
सहदेव भाडळीने प्रस्थापित केलेल्या हवामान आणि पीकपाण्याच्या अंदाजाच्या पद्धतीप्रमाणेच वऱ्हाडात त्याच कामासाठी भेंडवळच्या घटमांडणीची पद्धत रूढ आहे. ही घटमांडणी ३५० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेडवळ गावात होणारी घटमांडणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते.
 
शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास आहे. दरवर्षी या मांडणीचे भाकित ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात. मांडणीचे भाकित घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, ते ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तविण्यात येतो. पावसाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.
 
रामचंद्र वाघ यांनी सुमारे १६५० साली वातावरणातील बदलावरून नक्षत्रांचा अभ्यास केला. पुढे पाऊस, पिकांची भविष्यवाणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनीच ही घटमांडणी सुरू केली, असे सांगण्यात येते. गावाच्या पारावरील हनुमान मंदिराच्या परिसरात आणि गावातील पूर्वेच्या शेतात अशा दोन ठिकाणी घटमांडणी केली जाते. पारावरची घटमांडणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तर शेतातील मांडणी अक्षय तृतीयेला होते. दोन्ही मांडणींचा अंदाज एकाच दिवशी अर्थातच अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी सांगण्यात येतो. आज पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज वगैरेंनी चंद्रभान महाराजांची परंपरा जशीच्या तशी घटमांडणी करून जोपासली आहे.

तेव्हाच्या चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला आहे. घटमांडणीनंतर वर्तवलेली गेलेली पीकपाणी, राजकीय आणि आर्थिक भाकिते बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणते, तरी वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजही भेंडवळचे महत्त्व कमी झालेले नाही. अक्षय तृतीयेला या गावात विदर्भ, खानदेशसह अनेक भागातून शेतकरी मुक्कामाला येऊन दुसऱ्या दिवशीच्या पहाटेची वाट पाहतात.
 
घटमांडणीतील पावसाबाबत अंदाज
जून महिन्यात कमी पाऊस पडणार त्यामुळे पेरणीस उशिर होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी होणार असल्याची देखील सांगण्यात आलं आहे. तर, सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी पडणार. या काळात अवकाळी पावसाची चिन्ह असून, पिकांचे नुकसान होईल असं सांगण्यात आलं आहे.
 
गेल्या वर्षी देशावर करोनासारख्या भयंकर रोगाने आक्रमण केलं होतं. येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची, पिकांची, देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे? हे यावेळच्या अंदाजातून समजून घेऊया. हे अंदाज किती खरे ठरतात यावर शंका उपस्थित केली जाते. या प्रथेला वैज्ञानिक आधार नाही. मात्र, शेतकरी यावर मोठा विश्वास ठेऊन आपल्या वर्षभराचं शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसारच करतात.
 
काय आहे यंदाचा अंदाज?
कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिके चांगली येतील. शेतमाला भावही चांगला मिळेल. तर वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील. देशात पीक चांगले येईल. मात्र पिकांना भाव मिळणार नाही, असा अंदाज करण्यात आलाय.
 
 
राजकीय भाकीत
राजा कायम असणार म्हणजे देशात सत्तापालट ( pm modi ) होणार नाही. देशाचं संरक्षण चांगलं राहील. परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असंही सांगण्यात आलंय.
 
पावसाचा सर्वसाधारण अंदाज
पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असणार आहे, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे.
 
पावसा संबंधीचे अंदाज
जून - कमी , पेरणी उशिरा होईल
जुलै - सर्वसाधासरण
ऑगस्ट - चांगला , अतिवृष्टी होईल
सप्टेंबर - कमी , अवकाळी पाऊस भरपूर, पिकांचे नुकसान होईल
 
राजकीय भाकीत
राजा कायम असणार म्हणजे देशात सत्तापालट  होणार नाही. देशाचं संरक्षण चांगलं राहील. परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असंही सांगण्यात आलंय.
 
(टिप – भेंडवळची घटमांडणी ही बुलडाण्यातील जुनी पंरपरा आहे. आम्ही  केवळ या घटनेचं वार्तांकन/ रिपोर्ट तयार केलाय . यांनी वर्तवलेल्या अंदाजाची आम्ही पुष्टी करत नाही.)
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला गुजरात एटीएस ने अटक केली

पुढील लेख
Show comments