Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राणे यांना फोन करून भुजबळ म्हणाले ..

राणे यांना फोन करून भुजबळ म्हणाले ..
, शुक्रवार, 9 जुलै 2021 (22:40 IST)
भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळालेल्या नारायण राणेंनी मोदींच्या कॅबिनेटमध्ये लघु-सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. नारायण राणे यांच्या कामाची उंची मोठी मात्र, खाते लघु-सूक्ष्म असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. महाविकास आघाडीचे मंत्री आणि एकेकाळी शिवेसेनेत राणे यांचे सहकारी राहिलेल्या छगन भुजबळ यांनी मात्र राणेंना फोन करत शुभेच्छा दिल्या.
 
भुजबळ म्हणाले, मी स्वतः राणे यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. राणेंना देण्यात आलेल्या खात्याबाबत ते म्हणाले, कोणतेही खातं कमी किंवा जास्त महत्वाचं नसते तर त्या खात्याचं काम कसे होते यावरून त्या खात्याचे महत्व वाढत असते. त्यामुळे निश्चितच ते चांगलं काम करतील असे ते म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्मार्टफोन वापरण्याच्या बाबतीत भारत दुसर्या क्रमांकावर आहे, जाणून घ्या कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे