Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फोन टँपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा

Webdunia
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2023 (21:46 IST)
मुंबई उच्च न्यायालयाने फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मोठा दिलासा दिला आहे. IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेले दोन FIR हायकोर्टानं रद्द केले आहेत. त्यामुळं रश्मी शुक्ला यांना सरकारनं क्लीनचीट दिली आहे.
 
हायकोर्टाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन FIR रद्द केले आहेत. एक FIR पुण्यात तर दुसरा मुंबईत नोंदवण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना राज्य गुप्तचर विभगाच्या प्रमुख या नात्याने विरोधी पक्षातल्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचं हे प्रकरण आहे. फडणवीस सरकारनंतर जेव्हा राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर रश्मी शुक्लांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. नाना पटोले, संजय राऊत, एकनाथ खडसे यांचे फोन केल्याप्रकरणी हे दोन FIR करण्यात आले होते. ते रद्द करण्यात आले आहेत.
 
फोन टॅपिंगचे प्रकरण काय?
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचा आरोप रश्मी शुक्लांवर करण्यात आलेला होता. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप रश्मी शुक्लांवर ठेवण्यात आला. रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरून गुप्तवार्ता विभागाने नेत्यांचे फोन टॅप केले. त्या नेत्यांचे फोन बनावट नावांनी टॅप करण्यात आल्याचा आरोप आहे.
 
नाना पटोले यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे त्यांचा फोन टॅप करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री रावसाहेब दानवेंचे स्वीय सहाय्यक आणि तत्कालीन भाजपचे खासदार संजय काकडे, इतर लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करण्यात आले होते.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणूक निकालांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

निवडणूक निकालांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

प्रियंका गांधींनी 4 लाखांहून अधिक फरकाने निवडणूक जिंकली

महाराष्ट्राच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मतदारांचे आभार

पुढील लेख
Show comments