Festival Posters

भाजपाची विजयाची जय्यत तयारी, कार्यालयात मिठाई बनवण्याची सुरुवात

Webdunia
गुरूवार, 24 ऑक्टोबर 2019 (10:25 IST)
विधानसभा २०१९ च्या निवडणुकीचा आज काही वेळात  निकाल स्पष्ट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा कार्यालयात मिठाई बनवण्याची जोरदार तयारी सुरु आहे. राज्यात  भाजपाने आपल्या विजयोत्सवाला सुरुवात केली आहे.
 
राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान झाले. नंतर लगेचच विविध माध्यमांचे एग्झिट पोलही समोर आले होते. याच पोलमधून पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे सांगितले गेले आहे. त्यामुळे भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साहाचे दिसून येतो आहे. आम्ही २५० च्या जवळपास जागा जिंकून राज्यात महायुतीचेच सरकार पुन्हा स्थापन होईल असा विश्वासही सर्व नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान आज दि.२४ मतमोजणी पूर्ण होत असून, दुपारपर्यंत राज्यात कोण सत्तेत येईल हे उघड होणार आहे. या पार्श्वभूमीवर विजयाची खात्री असल्याने भाजपाने आपल्या कार्यालयामध्ये विजयाची जय्यत तयारी सुरु केली आहे. त्यासाठी लाडू बनवण्याचे काम सुरु असून ५ हजार लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे. तरीही एग्झिट पोलचे मत काहीही असले आज मतमोजणी संपूर्ण प्रत्यक्ष निकाल समोर येई पर्यंत कोणाकडे सत्तेच्या चाव्या असतील हे स्पष्ट होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

IND U19 vs ENG U19 World Cup : भारताने 19 वर्षांखालील विश्वचषक इंग्लंडला 100 धावांनी पराभूत करून जिंकला

LIVE: मालेगाव महापौर निवडणुकीसाठी ओवेसींसोबत एकनाथ शिंदे एकत्र येणार!

नागपूर देशाचे नवे 'औद्योगिक केंद्र' बनणार, फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 11 आघाडीच्या कंपन्यांसोबत ऐतिहासिक करार

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग सायबर फसवणुकीला बळी

लग्नातील पाहुण्यांना घेऊन जाणारी बस नेपाळ सीमेजवळ खोल दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments