Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग

Webdunia
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (14:32 IST)
मुंबईतील दोन ठिकाणी इतिहासात प्रथमच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. मुंबई यंदा शिवाजी पार्क आणि वांद्रे कुर्ला संकुलन (बीकेसी) येथे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यासाठी सध्या गर्दी जमवण्यासाठी हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लहान-मोठ्या अशा एकूण 10 हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. यामध्ये 6 हजार एसटी तसेच खासगी बसगाड्यांचा समावेश आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1800 एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. 3 हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण पूर्ण झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने 1400 खासगी बस आरक्षित केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत.
 
- कसारा, कर्जत, खोपोली, पालघर, विरार, डहाणू रोड येथून येणाऱ्या मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, 7 आसनी कार अशा वाहनांची संख्यादेखील हजारोंच्या संख्येत असेल.
- एसटीचे 24 तासांसाठी किमान भाडे 12 हजार रुपये आहे.
- 24 तासांनंतर 56 रुपये प्रति किमी या दराने महामंडळ आकारणी करते.
300 किमी अंतराला 7 आसनी इनोव्हा गाडीसाठी साधारण 5,100 ते 5,700 रुपये, - 13 आसनी ट्रॅव्हलरसाठी 6 हजार ते 6500 रुपये भाडे आकारण्यात येते.
- मिनी बससाठी 7200 ते 7800 असे दर असल्याचे समजते.
- 2 हजार बस उभ्या राहतील, अशी व्यवस्था कालिना परिसरात करण्यात आली आहे.
- वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदानांत प्रत्येकी 1 हजार आणि सोमय्या मैदानात 700 ते 900 वाहने उभी करण्याचे नियोजन आहे.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: ठाण्यात लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट

ठाणे : लोकलमध्ये एका महिला प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट

मुंबईत पार्किंग वरून झालेल्या वादात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला, दोघांना अटक तर दोन फरार

साताऱ्यात मधमाश्यांच्या हल्ल्यात सहा गिर्यारोहक जखमी

कोल्हापुरात मराठी चित्रपटांना समर्पित एक भव्य संग्रहालय उभारले जाणार

पुढील लेख
Show comments