Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वयंपाकावरून झालेल्या वादामुळे सहकर्मीची निर्घृण हत्या, आरोपीला अटक

Webdunia
शुक्रवार, 28 जून 2024 (16:24 IST)
स्वयंपाक करण्यावरून झालेल्या वादावरून एका व्यक्तीने दुसऱ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील अंजोरा गावात घडली आहे. या हत्येमध्ये वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त करून आरोपीला अटक केली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येचे कारण स्वयंपाक वरून झालेला वाद आहे.शेर सिंग मंगलसिंह उईके असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. मयत वागताळा तहसील लामटा, जिल्हा बालाघाट येथील रहिवासी आहे. तर आरोपीचे नाव बादल उर्फ रामचरण राम प्रसाद उईके रा.वागताळा तहसील लामटा, जिल्हा बालाघाट आहे. हे दोघे मजुरी करायचे. 

अंजोरा गावातील एका शेतात ठेकेदारांचा बांबू डेपो असून शेतात लेबर क्वार्टर असून हे दोघे तिथे राहायचे. 
सदर घटना 26 जून रोजी घडली. हे दोघे मजूर एकत्र राहत असून त्यांच्या मध्ये बिर्याणी बनवण्यावरून वाद झाला. बादल ने शेरसिंग ला आज स्वयंपाक करण्याची पाळी तुझी आहे. अशी आठवण करून दिली.मात्र शेरसिंग ने स्वयंपाक करण्यास नकार दिला. या वरून दोघांमध्ये वाद झाला. बादलला राग आला आणि त्याने धारदार शस्त्र घेऊन शेरसिंगच्या छातीत आणि डोक्यावर मारले त्यामुळे शेरसिंगचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. आरोपीने खुनाची कबुली दिली.आमगाव पोलीस ठाण्यात आरोपी बादल उर्फ ​​रामचरण उईके याच्याविरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुरज रेवण्णाच्या अडचणीत वाढ, 3 जुलैपर्यंत सीआयडी कोठडीत वाढ

भाजप कडून विधानपरिषदेची पाच नावे जाहीर, पंकजा मुंडे यांना संधी

भारताचा कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर 10 विकेट्स राखून विजय; स्नेह राणाने रचला इतिहास

आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवत नाही, आम्ही जनतेत जातो म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मराठा आरक्षण: 'निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये निष्काळजीपणाचा युक्तिवाद- मुंबई उच्च न्यायालय

सर्व पहा

नवीन

भुशी डॅम दुर्घटनेतील पाचवा मृतदेह सापडला

दिल्ली उच्च न्यायालयाने BRS नेत्या के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला

पुण्यात झिका व्हायरसचा पाचवा रुग्ण आढळला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

जे स्वत:ला हिंदू म्हणवतात, ते हिंसा करतात, राहुल गांधींच्या वक्तव्यावर लोकसभेत गदारोळ

पुढील लेख
Show comments