Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत मोकाट सुटलेल्या रेड्यांचा बंदोबस्त केला पाहीजे: देवेंद्र फडणवीस

Webdunia
गुरूवार, 18 जानेवारी 2024 (08:25 IST)
ठाकरे गटाने महापत्रकार परिषदेमध्ये विधानसभा सभापती राहूल नार्वेकर आणि शिंदे सरकारवर जोरदार आरोप करताना सुप्रिम कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप केला. तसेच राहूल नार्वेकरांच्या विरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याचे सांगून त्यांनी जाहीर आवाहनही त्यांनी केले. कालच्या पत्रकार परिषदेनंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहेत…त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण गरजेचं असल्याचं म्हणून ठाकरे गटाला एकप्रकारे इशाराचं दिला आहे.
 
आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी आपला निर्णय जाहीर केला. या निकालात शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना पात्र ठरवण्यात येऊन एकनाथ शिंदे यांची निवड योग्य असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या ठाकरे गटाने जाहीर महापत्रकार परिषद घेऊन सभापती राहूल नार्वेकर यांनी निशाण्यावर धरलं आहे. तसेच तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख शुर्पणखा असा केला.
 
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर आहेत. कराड येथील जाहीर कृषी प्रदर्षनाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी जाहीर सभेत त्यांनी ठाकरे गटावर निषाणा साधला. ते म्हणाले, “कराडच्या कृषी प्रदर्शनात ४२ लाखांचा बैल आला आहे…इलेक्ट्रॉनिक बैलही आलेला आहे…सर्वात छोटी गायही आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या कृषी प्रदर्शनात अनेक गोष्टी पाहण्यास मिळत आहेत….फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या मुंबईतही काही रेडे मोकाट सुटलेत…त्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना असेल मला कळवा. ते रेडे इतके टीव्हीवर बोलतात की त्यावर उपायाचं काही तंत्रज्ञान असेल तर ते आम्हाला सांगा” असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

नवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये? योग्य नियम जाणून घ्या

शारदीय नवरात्री 2024 : नऊ देवींची नऊ रूपे जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

तुम्हाला पुन्हा पुन्हा कॉफी पिण्याचे व्यसन लागले आहे का? या 10 मार्गांनी ही सवय सुधारा

सावळी त्वचा असल्यास अशी घ्यावी काळजी, त्वचा होईल चमकदार

सर्व पहा

नवीन

5th October World Teachers Day 2024: भारत का साजरा करतो शिक्षक दिन, जाणून घ्या

राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कोल्हापुरात संविधान वाचवा परिषद घेणार

PM Modi आज महाराष्ट्र दौऱ्यावर, अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार

प्रसिद्ध वकील माजीद मेमन यांचा टीएमसी सोडून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

काय सांगता, महिलेच्या पोटातून बाहेर काढला दोन किलो केसांचा गुच्छ

पुढील लेख
Show comments