Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापुरात CAकडून महिलेवर बलात्कार

Webdunia
शनिवार, 11 डिसेंबर 2021 (11:17 IST)
कोल्हापुरात एका सीएने महिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.चंद्रकांत चौगुले असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपी चौगुले हा सांगली शहरातील विश्रामबाग परिसरातील सिल्व्हर ओक अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. तर पीडित महिला ही घटस्फोटित असून ती आपल्या दोन मुलांसह आईसोबत कोल्हापूर येथे राहते. पती सांभाळत नसल्याने पीडित महिलेनं 2012 साली घटस्फोट घेतला होता. पतीपासून वेगळं झाल्यानंतर, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांना काही पैशांची आवश्यकता होती.
 
त्यामुळे पीडित महिलेच्या एका परिचिताने सांगलीतील सीए चंद्रकांत चौगुले यांचा सल्ला घेण्यास सांगितलं. त्यामुळे पीडितेनं चौगुलेशी संपर्क साधला असता, त्याने कागदपत्रे घेऊन पीडितेला सांगलीला बोलावलं. यानंतर आरोपी विविध कारणं देऊन पीडितेला वारंवार सांगलीला बोलावू लागला. दरम्यान एकेदिवशी आरोपीनं पीडितेला घरी बोलावलं. यावेळी घरी कोणीचं नव्हतं. याची संधी साधत आरोपीनं पीडितेवर प्रेम असल्याचं सांगत लग्नासाठी मागणी घातली. पण पीडितेनं लग्नास नकार दिला. महिलेनं नकार देताच आरोपीनं पीडितेवर जबरदस्ती करत अत्याचार केला.
 
या घटनेनंतर आरोपीनं 2012 ते 2018 या कालावधीत पीडितेला बदनाम करण्याची धमकी देत अनेकदा अत्याचार केला आहे. पीडित महिलेनं 2018 साली आरोपीसोबत संबंध तोडल्यानंतर देखील त्याचा त्रास सुरूच राहिला. संबंध तोडल्यानंतर आरोपीनं लैंगिक संबंधाची माहिती पीडितेच्या पतीला देखील दिली आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments