Festival Posters

‘बार्टी’ मार्फत एम.फिल, पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Webdunia
शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (09:14 IST)
सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
 
BANRF-2021 अंतर्गत एकूण 200 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येणार आहे. याअंतर्गत एम.फिल/ पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना RGNF/NFSC च्या धर्तीवर JRF साठी  रु. 31000/-  व SRF साठी रु. 35000/- प्रतिमहा प्रमाणे अधिछात्रवृत्ती रक्कम तसेच वार्षिक आकस्मिक खर्च, घरभाडे रक्कम देण्यात येते. एम.फिल साठी एकूण 2 वर्ष, पीएच.डी. साठी एकूण 5 वर्षे तसेच एम.फिल / पीएच.डी (Integrated Course) एकूण 5 वर्षे अधिछात्रवृत्ती विद्यार्थ्यांना देण्यात येते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी बार्टीचे अधिकृत संकेतस्थळ https://barti-maharashtragov.in ला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे  महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

पुढील लेख
Show comments