Festival Posters

क्रूझर आणि दुचाकीचा अपघात, एका तरुणासह चिमुरडीचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (17:18 IST)
नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे सातमोरीच्या भरवस फाटा या रस्त्यावर क्रूझर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका तरुणासह ६ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. तर १९ जण  जखमी झाले आहेत. जखमींना निफाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  रात्री उशीरा हा अपघात झाल्याचे कळते. राहता तालुक्यातील जळगाव व सिन्नर तालुक्यातील शहा पांचाळे परिवार अंतापूर ताहराबाद येथे देव दर्शनासाठी क्रूझर गाडीने चालले होते. यावेळी भरवसच्या दिशेने दुचाकीवर  विलास यादव पगारे (३८) हे येत होते. या दोन्ही वाहनांची सातमोरी जवळ समोरासमोर टक्कर होऊन या अपघातात विलास पगारे (रा वेळापुर ता कोपरगाव) हे जागेवर ठार झाले. तर क्रूझर गाडी उलटी झाल्याने गाडीमधील लहान मुलगी कल्याणी बाळू घोडेराव (६) हिचा मृत्यू झाला. 
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

NEET पेपरफुटी प्रकरणी १० वी अटक: १०० कोटींच्या कोचिंग साम्राज्याचा मालक शिवराज मोटेगावकर लातूरमध्ये अटकेत

LIVE: BMC ने मुंबईत १४७ 'कचरा-संवेदनशील ठिकाणे' निश्चित केली; 'कचरामुक्त मोहीम' तीव्र

महाराष्ट्र सरकारची Uber, Ola आणि Rapido वर कडक कारवाई; Apple आणि Google ला ॲप्स काढून टाकण्याचे निर्देश

नागपूरमध्ये RSS मुख्यालयाजवळ गोळीबार; ६ जणांना अटक

उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंकडून जमीन प्रकरणात दिलासा

पुढील लेख
Show comments