suvichar

सावधान, राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (16:36 IST)
राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या छायेखाली आहे.
 
5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण असेल. उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे.
 
राज्यात 5 ते 11 फेब्रुवारी दरम्यान, कोकणात पावसाळी वातावरण असेल. या पावसाळी वातावरणामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. पावसामुळे आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: नागपूरमधील स्फोटक कारखान्यात स्फोट

जमकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवला, इराणने अमेरिका आणि इस्रायलला विनाशाचा इशारा दिला

इंडिगोची पुणे-बँकॉक विमानसेवा तात्पुरती स्थगित, प्रवाशांमध्ये संतापाची लाट

कमी दृश्यमानता आणि सुरक्षेतील त्रुटी ही अजित पवारांच्या विमान अपघाताची कारणे, AAIB चा तपास अहवाल प्रसिद्ध

अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण रोहित पवार करत आहेत', राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा गंभीर आरोप

पुढील लेख
Show comments