Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तारेतारका, खेळाडू ऑनलाइन गेमिंगची जाहिराती करू नये : फडणवीस

Webdunia
गुरूवार, 14 डिसेंबर 2023 (21:28 IST)
ऑनलाइन गेमिंग अर्थात जुगाराच्या सततच्या जाहिरातीमुळे खेळण्याचा मोह होऊन त्याची सवय जडते. त्यामुळे ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती करणाऱ्या व्यक्तींनी अशा जाहिराती करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात केले. अशा जाहिरातींवर नियंत्रण आणणे शक्य आहे किंवा कसे हे तपासून पाहिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी  विधानसभेत महादेव अ‍ॅपच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी होताना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी ऑनलाइन गेमिंगच्या जाहिरातींची तक्रार केली. चित्रपट सृष्टीतील तारेतारका, खेळाडू ऑनलाइन गेमिंगची जाहिराती करतात. त्याचा समाजावर दुष्परिणाम होत असल्याने या जाहिराती रोखण्यात याव्यात, अशी मागणी कडू यांनी केली. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनीही समाजातील प्रथितयश लोक टेलिव्हिजनवर जाहिराती करून जुगाराला प्रोत्साहन देत असल्याची तक्रार केली.
 
या प्रश्नांना देताना फडणवीस यांनी ऑनलाइन गेमिंगची कार्यपद्धती सभागृहाला सांगितली. प्रत्यक्षातील जुगार आता ऑनलाइनवर आला आहे. त्यासाठीचे अ‍ॅप दुबईहून नियंत्रित केले जातात. ऑनलाइन गेम खेळताना आयडी क्रमांक दिला जातो. त्यानंतर अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून चार बँकांमध्ये खाती काढतात आणि वेगवेगळे खेळाडू बनून ते खेळ खेळतात. त्यामुळे अशा खेळावर नियंत्रण आणण्यात अडचण नाही. मात्र, डार्कनेटवर सुरु असलेले गेम थांबवणे कठीण आहे. त्यामुळे यासंदर्भात कडक नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र बोर्डाने परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून, दहावीचा पेपर 21 फेब्रुवारीपासून तर बारावीचा पेपर 11 फेब्रुवारीपासून होणार

भाजप जिंकल्यास फडणवीस मुख्यमंत्री होणार ! या बैठकीनंतर गोंधळ वाढला

'महाराष्ट्रात एमव्हीए बहुमताने जिंकेल', निवडणूक निकालापूर्वी रमेश चेन्निथला यांचा दावा, मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हे बोलले

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह कॉमेंट्री

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

पुढील लेख
Show comments